राकेश आसोले चित्रा न्युज
सोलापूर :-सगे सोयरे कायदा पारित करण्यासाठी आनंद काशीद यांनी सुरु केलेल्या अमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. त्यांच्या प्रकृतीत प्रकर्षाने बिघाड झाला आहे, परंतु उपचार घेण्यास त्यांनी नकार दिला आहे. डॉक्टर व समाज बांधवांनी काशीद यांना उपचार घेण्याची विनंती केली, मात्र काशीद यांनी ती विनंती धुडकावून लावली. त्यांच्या मते, जोपर्यंत मनोज जरांगे पाटील उपचार घेत नाहीत, तोपर्यंत आपणही उपचार घेणार नाही.
आनंद काशीद यांच्या या जिद्दीमुळे समाज बांधवांची काळजी वाढली आहे. त्यांनी उपचार घेण्यासाठी काशीद यांना विनंती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. या आंदोलनाच्या ठिकाणी विनायक घोडके, विक्रम घायतिडक, माऊली पाटील, बालाजी आवारे, ऋषीं जगदाळे, अशोक आगलावे यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
काशीद यांच्या उपोषणामुळे शासनावर दबाव वाढत असून सगे सोयरे कायदा पारित करण्याची मागणी अधिकच तीव्र झाली आहे. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत समाजाने शासनाला त्वरीत निर्णय घेण्याची विनंती केली आहे. समाजाच्या या आंदोलनामुळे कायदा पारित होण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल अशी अपेक्षा आहे.
0 टिप्पण्या