Ticker

6/recent/ticker-posts

सुयश विद्यालय बार्शीच्या नवीन शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात

हर्षवर्धन देशभ्रतार चित्रा न्युज 
सोलापूर: बार्शी शहरातील सुयश विद्यालयात आजपासून नवीन शैक्षणिक वर्षाची उत्साहवर्धक सुरुवात झाली. शाळेचे मुख्याध्यापक सागर मंडलिक आणि सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. विद्यार्थ्यांना गाजत वाजत, फुगे, गुलाब आणि चॉकलेट देऊन त्यांच्या नव्या प्रवासाची सुरुवात करण्यात आली.

शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे नावाने स्वागत करणारे बॅनर लावण्यात आले होते आणि शाळेच्या प्रांगणात रंगीबेरंगी फुग्यांची सजावट केली गेली होती. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक स्पष्ट दिसत होती आणि त्यांच्या हसर्या चेहऱ्यांनी शाळेचे वातावरण उजळून टाकले होते.

संस्थापक अध्यक्ष शिवदास नलवडे यांनी या विशेष क्षणावर आपले विचार व्यक्त केले, "आमच्या शाळेच्या नवीन वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या उत्साहाने भरलेली आहे. आम्ही त्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी केली आहे. आमचे शिक्षक विद्यार्थी शिक्षणाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांचा भविष्यातील यशासाठी कटिबद्ध आहेत."

विद्यार्थ्यांनी देखील शाळेत परत येण्याच्या आनंदात आपल्या उत्साहाचे व्यक्त केले. एका विद्यार्थ्याने सांगितले, "आम्हाला शाळेत परत येऊन खूप आनंद होत आहे. आम्ही आमच्या मित्रांना भेटून आणि नवीन गोष्टी शिकून खूप उत्सुक आहोत."

शाळेच्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांचा उत्साह आणि शिक्षकांची कटिबद्धता पाहून बार्शी शहरातील शैक्षणिक वातावरणात नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे. 

सुयश विद्यालयाच्या वतीने सर्व नव्या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या