Ticker

6/recent/ticker-posts

जंग जारी रहेगी ...

जंग जारी रहेगी ...

निवडणूक मधील 'विजय' कुणी दोन पाच जण खेचून आणत नसतात ते सामूहिक असते तसेच 'अपयश' हे देखील सामूहिक असते...
अपयशातून विश्लेषण करीत पुढे जाणे हा राजकीय शहाणपणा असतो.पक्षाने देखील तसे जाहीर केले आहे. 
काही लोकांना राजकीय विश्लेषक असल्याचा आजार जडला आहे.मोकळ्या मैदानाच्या कट्ट्यावर किंवा दिवाखान्यात बसून स्विमिंगचे प्रशिक्षण देणाचा हा प्रकार आहे.चूक सांगणे आणि टार्गेट करणे हे दोन्ही वेगळे आहे.असे अर्धवट विश्लेषक एकही निवडणुकीत किंवा मोर्चे आंदोलनात आंबेडकरी पक्षात नसतात.त्यामुळे त्यांची तमा बाळगू नका.
ह्या निवडणुकीत लोकांनी संविधान आणि लोकशाही आबाधित ठेवण्या साठी आणि नरेंद्र मोदी विरुद्ध मतदान करताना देशाच्या व्यापक कॅनव्ह्स पाहून मते दिली.आपण मार्केटींग मध्ये कमी पडलो.वंचित विरुद्ध निवडणूक काळात जाणीवपूर्वक सेट केलेला 'नरेटिव्ह' खोडून काढता आला नाही.हे समजून घ्या.
आकडे जरी आपल्या बाजूला नसले तरी ह्या आधी तरी कुठे आकडे आपल्या बाजूने होते?तरी देखील साहेबांनी अत्यन्त प्रतिकूल परिस्थिती मधून वंचित बहुजन आघाडी तिसरा पर्याय म्हणून उभा केला आहे.मतदार हा कुणाही एकाची मक्तेदारी नसतो तो आपल्या सोयीने निर्णय घेत असतो.आजही तो लोकशाही आणि संविधानाचे बाजूने आहे हे लक्षात ठेवा.जे टीका करतात  त्यांना ह्या पक्षाचे आणि तुमच्या प्रश्न व लढ्याशी काही देणे घेणे नाही.यश येवो की अपयश आपल्याला लढावेच लागेल.

साधने आणि अमाप पैसा लावून एकीकडे महायुती तर दुसरीकडे मविआ लढली आहे. एका वेळी सहा पेक्षा अधिक राजकीय पक्षा सोबत लढायला आपल्याला भाग पाडले गेले. अगदी सुप्रिया सुळे शाहू महाराज व काँग्रेस उमेदवार ह्यांना पाठिंबा दिल्यावर देखील अकोल्यात बाळासाहेबांचे विरुद्ध काँग्रेस का लढली हा प्रश्न बुद्धिजीवी आणि विचारवंतांना का पडत नसावा? पराभूत झालेले अभय पाटील राज्यात आणि देशात अन्याय अत्याचार विरुद्ध लढणार आहेत कि बाळासाहेब? 
एका पराभवाने विरघळून जायला आपण मातीची माणसे नाही.लढणे हा योध्याचा आणि पळणे हा पळपुट्याचे वैशिष्ट्य असते.संघर्षाचा मार्ग निवडायचा की आश्रीत म्हणून जगायचे....
Choice is yours...

राजेंद्र पातोडे 
प्रदेश प्रवक्ता 
वंचित बहुजन आघाडी 
महाराष्ट्र प्रदेश 
9422160101


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या