Ticker

6/recent/ticker-posts

पुरुषोत्तम मोटघरे यांचे मरनोपरांत नेत्रदान



रवी भोंगाने साकोली 
साकोली:-पुरुषोत्तम पुंडलीक मोटघरे  धर्मापुरी कुंभली येथील पुरुषोत्तम पुंडलिक मोटघरे यांचे वयाच्या  ४९ व्यां.वर्षी  दि ३१.५.२०२४ ला निधन झाले. मानवी शरीराचा महत्वाचा अवयव असलेले  डोळे मृत्युनंतर ही ६ तास पर्यंत जिंवंत असतात. ते जाळन्यापेक्षा त्यांचे दान केल्यास दोन दृष्टीहिनांना दृष्टी प्राप्त होते. ही जाणीव असल्यामुळे त्यांची पत्नी श्रीमती त्रिफला मोटघरे, आई लिला व मुलगा सुजल यांनी त्यांचे मरनोपरान्त नेत्रदान करन्याचा निर्णय घेतला. डॅा ऊषा डोंगरवार -काशीवार, सौ. सोनाली लांबट , डॅा मारोती बोरकर सेंदुरवाफा यांनी आवश्यक पाऊले ऊचलुन नेत्रदान कार्य घडवुन आणन्याकरीता सहकार्य केले. सुरज आय ईन्स्टीट्युट नागपुरचे डॅा. स्नेहा  राठोड, डॅा. डेझी चौधरी, डॅा. विश्वजीत निकम आणि त्यांची तज्ञ चमु नागपुर वरुन धर्मापुरीला पोहोचले व नेत्रदान प्रक्रीया पुर्ण केली. दुखःद प्रसंगी सामाजीक भान राखुन नेत्रदान केल्याबद्दल मोटघरे कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या