Ticker

6/recent/ticker-posts

कर्मयोगी तहसिलदारांमुळे शिरूर तालुका राज्यात नंबर वन -शरद पवळे (महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे शरद पवळे)

तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांचे १०५ शिव पाणंद रस्त्यांसाठी भुमिअभिलेखला आदेश

चित्रा न्युज प्रतिनिधी 
अहमदनगर:-राज्यभर शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातुन शेतकऱ्यांचा शेतरस्त्यांचा अत्यंत ज्वलंत प्रश्न या प्रश्नावर प्रशासकीय न्यायालयीन संघर्षासोबत राज्यव्यापी जनजागृती जनआंदोलन शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातून सुरू असताना शिरूर तालुका तहसिलवर शिव पाणंद शेतरस्ता कृती समितीच्या माध्यमातून शिव पाणंद शेतरस्ते खुले करण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा चालु असताना शिरूर तालुक्याचे तहसीलदार बाळासाहेब म्हके यांनी शिरूर तालुक्यातील स्वातंत्र्यपूर्व काळापासुन बंद असणाऱ्या शिव पाणंद शेतरस्त्यांच्या मोजणी करून हद्द निश्चित करण्याचे आदेश शिरूर तालुका उपअधिक्षक अमोल भोसले यांना दिले असून याची दखल घेत तालुका भुमिअभिलेखने २२ भुमापक सर्व्हरांची नेमणूक करत तालुका पोलिस प्रश्नासन,तलाठी, मंडल अधिकारी ,ग्राम शेत रस्ता समिती यांसमवेत  शिवपाणंद शेतरस्ते कृती समितीच्या वतीने तालुक्यात मोठे काम उभे झाले आहे याकामी शिरूर तालुका कृती समितीच्या ॲड.सुप्रिया साकोरे,पत्रकार रविंद्र खुडे , पत्रकार फैजल पठाण,विजय शेलार, सुरेश वाळके, शांताराम पानमंद आदींच्या माध्यमातून तालुकाभर शेतरस्ते खुले करण्याची जोरदार मोहीम सुरू झाली असुन सदर कालावधीत अतिक्रमित झालेल्या तातडीच्या मागणी रस्त्यांचीही दखल घेतली जात आहे याचा मोठा आदर्श राज्यात निर्माण होत आहे शिरूर तहसिलदार,भुमिअभिलेख कार्यालय,पोलिस प्रभासन यांचे महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र बाप्पू सानप, अशोक शेळके सर,प्रकाश वाखारे, सुभाष पाचर्णे, दत्ता यवले, बापुराव चव्हाण, राहुल शिंदे आदींसह शिरूर पंचक्रोशितील ग्रामस्थांनी मानले आभार.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या