Ticker

6/recent/ticker-posts

मुंबईसह राज्यातील 'या' भागात आज मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अनेक जिल्ह्यांना अलर्ट.


विजय चौडेकर  चित्रा न्यूज,

नांदेड:-मुंबई पुण्यासह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्गात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

याशिवाय उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होऊ शकतो. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पावसाबरोबरच वादळी वारे देखील वाहण्याचा अंदाज आहे. वाऱ्यांचा वेग 30-40 किमी प्रतितास असू शकतो, असं आयएमडीने सांगितलं आहे. दरम्यान, येत्या २४ तासांत धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांतही पावसाचा जोर वाढेल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या