Ticker

6/recent/ticker-posts

हिंगोली येथील डॉक्टर वर हल्ला प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्या बद्दल आरोपीला ६ महिन्याची कारावासाची शिक्षा व रू. १०,०००/- दंड



मोईन कादरी हिंगोली 
हिंगोली:- शहर पो.स्टे. अंर्तगत फिर्यादी डॉ. फैजल सलीम पठाण हे शासकिय रूग्णालय, हिंगोली येथे आपले कर्तव्य बजावत  असतांना आरोपी नामे सय्यद सलाउद्दीन हाशमी वय २६ वर्षे रा. आझाद रोड, पेन्शनपुरा हिंगोली जि. हिंगोली याने दिंनाक ०९/१२/२०२१ रोजी ११.०० वाजता शासकिय रूग्णालय, हिंगोली येथे येऊन कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरशी अरोरावी ची भाषा वापरूण दादागीरी करत हॉस्पीटल मधे आदळआपट करूण तोडफोड केली , धमक्या दिल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
   याबाबत सविस्तर वृत असे की फिर्यादीस तु माझोवर येथेच उपचार कर, औरंगाबाद जाण्यासाठी का सांगत आहेस. असे म्हणुन जोरजोराने ओरडुन टेबल वर आदळून व फिर्यादीच्या हातातील ओ.पी.डी रजिस्टर फेकुन देऊण फिर्यादीस म्हणला की, तु माझ्यावर इथेच ईलाज कर नाहीतर तु इथे नौकरी कशी करतो ते मी पाहुन घेतो अशी धमकी दिली व शासकिय कामात अडथळा निर्माण केला.
अशा फिर्यादीवरून पो.स्टे. हिंगोली शहर येथे गु.र.नं. ३८४/२०२१ कलम ३५३ भा.दं.वि. कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. 
    सदर प्रकरण हे हिंगोली येथील मा.तद्ध जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. पि.जी. देशमुख, यांचे समोर सदरचे केस निकाली लागली. 
महाराष्ट्र शासन विरूध्द या प्रकरणात आरोपी सय्यद सलाउद्दीन हाशमी वय २६ वर्षे रा. आझाद रोड, पेन्शनपुरा हिंगोली जि. हिंगोली. यास या गुन्हयात दोषी ठरवुन कलम ३५३ भादवी. मध्ये ६ महिन्याची कारावासाची शिक्षा व दंड व दंड न भरल्यास प्रत्येकी २ महिन्याची कारावासाची शिक्षा तसेच कलम ४४८ मध्ये १ वर्षाची शिक्षा व रू ५००/- दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास शिक्षा सुनावली व १००००/- सरकारपक्षातर्फे सरकारी वकील श्री. एस.डी. कुटे यांनी बाजू मांडली. व त्यांना सरकारी वकील श्री एन.एस. मुटकुळे व श्रीमती. सविता एस. देशमुख यांनी सहकार्य केले.
गुन्हयाचा तपास पो.उप. निरीक्षक माधव एकनाथ जिव्हारे पो.स्टे. हिंगोली शहर यांनी केला तपासकार्यात सहा.पो.उप.नि.फेरोज शेख पो.स्टे. हिंगोली शहर (कोर्ट पैरवी) यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या