Ticker

6/recent/ticker-posts

प्रश्नमंजुषा स्पर्धेत जनप्रभा महाविद्यालयाचे विद्यार्थी अव्वल

सचिन चौरसिया चित्रा न्युज 
रामटेक :-  राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५०  व्या जयंतीच्या निमित्ताने संमेलन सप्ताहाचे समारोपिय कार्यक्रमात शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित प्रश्न मंजुषा कार्यक्रम सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्प तालुका रामटेक व परिवर्तन मंच, रामटेक यांच्या वतीने तालुकास्तरीय प्रश्न मंजुषा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री नरेंद्र तिडके महाविद्यालय, रामटेकचे प्राचार्य डॉ. मनोज तेलरांधे होते.कार्यक्रमाचे संचलन प्रा.नरेश आंबिलकर यांनी केले.याप्रसंगी नागपूर जिल्हा प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रश्न मंजुषा कार्यक्रमात लोकराजा गटात जनप्रभा महाविद्यालय, रामटेक येथील हर्षिता येऊतकर, कुंती  वाट व आस्था शंग्रपवार या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच राजर्षी गटात श्री.नरेन्द्र तिडके कनिष्ठ महाविद्यालय रामटेक येथील राखी संभलवार, जयेश खेवले व आचल बलगेवार या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तर छत्रपती गटात श्रीराम कनिष्ठ महाविद्यालय, रामटेक येथील नयना हटवार,ॠतुजा हरखंडे,व हेतल कावळे यांनी सहभाग घेतला. अनुक्रमे लोकराजा गटाने प्रथम, राजर्षी गटाने द्वितीय तर छत्रपती गटाने तृतीय क्रमांक पटकावला. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या जिवनावर ४५  प्रश्नांच्या तिन फेरी घेण्यात आल्या. प्रश्न मंजुषेचे निवेदन रामटेक तालुका समतादूत राजेश राठोड यांनी केले.परिक्षण परिवर्तन मंच रामटेकचे कार्याध्यक्ष राहुल जोहरे व मौदा तालुका समतादूत दुर्योधन बगमारे यांनी केले.तर आभार प्रदर्शन प्रा.सुनील कठाणे यांनी मानले. यावेळी मंचावर सिनेट सदस्य डॉ.श्रीकांत भोवते, प्रा.तुलसीदास वाघमारे, प्रा.स्वप्निल मनघे, प्रा.सरीता सिंग, प्रा.अंजली बडवाईक,प्रा.जयश्री मने, प्रा.मिनाक्षी पोकळे आदी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
सदर उपक्रमासाठी बार्टीचे महासंचालक सुनील वारे, सहाय्यक आयुक्त नागपूर सुकेशिनी तेलगोटे, नागपूर जिल्हा प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले यांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या