४ जुलैला झाले राज्यभर आंदोलन
एस.डी.ओं. मार्फत दिले शासनास निवेदन
सचिन चौरसिया चित्रा न्युज
रामटेक:- पत्रकारांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने दि. ४ जुलै ला संपूर्ण राज्यभर आंदोलन पुकारले होते. त्या अनुषंगाने रामटेक तालुका शाखेच्या वतीने नुकतेच दि. ४ जुलै रोजी स्थानिक एस.डी.ओ. मार्फत शासनास निवेदन देण्यात आले.
सर्व छोटे-मोठे दैनिक, सर्व साप्ताहिक, लोकभिमुख असलेल्या न्युज पोर्टल, यूट्युब चँनलला, टीव्ही, रेडिओ या वेगवेगळ्या विभागांतील पत्रकारांच्या विविध मागण्यासाठी ४ जुलै ला व्हाईस ऑफ मिडीयाच्या वतीने संपूर्ण राज्यभर काळ्या फिती लावुन आंदोलन करण्यात आले. मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधावे असा यामागचा उदात्त हेतु होता. शासन, राज्य सरकार छोट्या छोट्या दैनिकांना, साप्ताहिकांना सावत्रपणाची वागणूक देत आहे, हे मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आले. येत्या विधानसभा निवडणुकीला याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी 'व्हॉईस ऑफ मीडिया' पत्रकार संघटना हजारो पत्रकारांना घेऊन ४ जुलै ला रस्त्यावर उतरले होते हे विशेष. 'व्हॉईस ऑफ मीडिया'च्या मागण्यांमध्ये एकुण १२ मागण्यांचा समावेश असुन त्याकडे शासनाने लक्ष देऊन त्या पुर्ण कराव्या अशी आशा बाळगण्यात आली आहे. एस.डी.ओ. वंदना सवरंगपते यांनी मी आपले हे निवेदन शासनाकडे पाठवते असे यावेळी सांगितले. निवेदन देते वेळी व्हाईस ऑफ मिडीया पत्रकार संघटना शाखा रामटेक चे अध्यक्ष राजु कापसे, कोषाध्यक्ष रामरतन गजभिए, महासचिव पंकज बावनकर, प्रसिद्धि प्रमुख सचिन चौरसिया यांचेसह सदस्य सुरेंद्र बिरणवार, प्रविण गिरडकर, प्रतिक डोंगरे आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या