Ticker

6/recent/ticker-posts

माध्यमिक विद्यालय नागलवाडी शाळेचा विद्यार्थ्यांचे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

पंकज पाटील चित्रा न्युज

जवळगाव :- चोपडा तालुक्यातील माध्यमिक विद्यालय नागलवाडी शाळेतील इ. 8 वी चे 3 विदयार्थ्यांनी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रु. 2024 ग्रामीण भागात मेरिट लिस्ट मध्ये येऊन घवघवीत यश संपादन केले त्यात
कु. सपना गोपाल कुंभार 62% चि. हेमंत अनिल पाटील -54% कु. तेजश्विनी दर्शन पाटील -51.33 यांनी परीक्षेत यश मिळवून शाळेचे व केंद्राचे नावलौकिक करणारे सर्व विदयार्थी, माध्यमिक विद्यालय नागलवाडी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व स्टाफ, मार्गदर्शक शिक्षक यांचे पुणे येथून गणित विषयाचा मार्गदर्शनासाठी नागलवाडी शाळेत आलेले एस.पी. कॉलेज पुणे तसेच भास्कराचार्य प्रतिष्ठान पुणे येथे गणित ऑलिम्पियाड मार्गदर्शक प्रा. रामकृष्णन सर व प्रा. रुबी आर.पी. यांचा हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे पुष्पगुच्छ व पेन देऊन अभिनंदन करण्यात आले. तसेच संस्थेचे सचिव आ. माधुरीताई मयूर व शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर. बी. पाटील सर यांनी मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या