विजय चौडेकर चित्रा न्यूज
नांदेड :-राज्याचे माजी मंत्री तथा जिल्ह्याचे मा.खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळ ता.उमरी च्या वतीने ग्रामीण पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पत्रकार गोविंदराव रामराव शिंदे बारूळकर यांना ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार (जिल्हास्तरीय पुरस्कार)प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा,संयोजक दिगंबर कदम करकाळेकर,अरुण पाटील -माजी कार्यकारी अभियंता नांदेड,उद्योजक जगन्नाथ चक्रावार,माजी सभापती शांतेश्वर पाटील,मधुकर अंतापुरे आदी जन उपस्थित होते.


0 टिप्पण्या