Ticker

6/recent/ticker-posts

वसमत न. प. चे विविध प्रलंबीत मागण्यासाठी कामबंद आंदोलन सुरू

मोईन कादरी हिंगोली
हिंगोल :-वसमत  नगर पालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी होत नसल्याने ६ ऑगस्टपासून नगरपालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू झाले आहे.

आंदोलनात वसमत येथील नगर पालिका कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे नगर पालिकेचे काम ठप्प झाले आहे मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असाइशारा संघटनेचे अध्यक्ष सुभाष कदम, जिल्हाध्यक्ष भिवाजी गायकवाड यांनी दिला आहे.

६ ऑगस्ट पासून नगर पालिकेचे कामकाज ठप्प न. प. चे अनेक कर्मचारी आंदोलनात सहभागी

महाराष्ट्र राज्य नगरपरिषदा, नगर पंचायती कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, संघर्ष समितीच्या वतीने विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे आंदोलनातील मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले मात्र त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही त्यामुळे कर्मचारी संघटनेने काम बंद आंदोलन सुरू केले आहेवसमत येथे या आंदोलनात वसमत नगरपालिकेच्या

स्वच्छता विभाग, पाणीपुरवठा विभाग, विद्युत विभाग, कार्यालयीन कर्मचारीही झाले सहभागी झाले आहेत. सर्व विभागाचे कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याने कामकाज ठप्प झाले आहे.

काम बंद आंदोलनात सर्व कर्मचारी सहभागी झाले असल्याचे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष कदम, जिल्हाध्यक्ष भिवाजी वाघमारे, केशव बुजवणे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या