राकेश आसोले चित्रा न्युज
सोलापूर- केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचरांच्या वेतनाविषयी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अत्यल्प वेतनामुळे संताप व्यक्त करण्यात आला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार माननीय प्रणिता ताई शिंदे यांना या परिचरांच्या मागण्यांचे निवेदन कॉम्रेड प्राध्यापक तानाजी ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.
केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य उपकेंद्रांमध्ये अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचर या पदांची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु, या पदासाठी केंद्र सरकारकडून केवळ प्रति महिना शंभर रुपये वेतन दिले जाते. या अत्यल्प वेतनामुळे परिचरांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होत आहे. राज्य सरकारकडून देखील 2900 रुपये प्रति महिना वेतन दिले जाते, त्यामुळे एकूण वेतन तीन हजार रुपये आहे. गेल्या दहा वर्षांत हे वेतन वाढलेले नाही.
1. वेतनवाढ: परिचरांचे वेतन सहा हजार रुपये प्रति महिना करावे.
2. पूर्णवेळ कामाचे मान्यता: अर्धवेळ परिचर या शब्दाऐवजी पूर्णवेळ परिचर म्हणून संबोधण्यात यावे.
3. संसदेतील आवाज: केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात संसदेमध्ये आवाज उठवावा.
4. मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांकडे विनंती: राज्य सरकारकडून वेतनवाढीसाठी मागणी करावी.
या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड प्राध्यापक तानाजी ठोंबरे, कॉ. ए.बी. कुलकर्णी, कॉ. डॉ. प्रविण मस्तुद, कॉम्रेड अंबादास तडकापल्ली, शोभा पवार, शितल करडे, तोळाबाई ओव्हाळ, बाई शेंडगे, सुवर्णा नंदाने, छबुबाई ढोरे, उषा कांबळे, कमल घोडके, सुरय्या शेख, सपना दुधर्गा, अनुराधा बोडरे, अनुराधा हेगडे, वनिता गुंड, मुमताज शेख, उमा गोरे, आशिया शेख, राजश्री साबळे, मेघा घुगे, कमल जगझाप, कोमल लोखंडे, महानंदा मोटे यांच्या सह्या आहेत.


0 टिप्पण्या