संघदीप मेश्राम चित्रा न्युज
बुलढाणा :-ता. मेहकर महाराष्ट्रात वाढत चाललेली गुन्हेगारी व लैगीक अत्याचाराचे प्रमाण या संपूर्ण गोष्टीकडे बघता कायदयामध्ये कठोर शिक्षेची तरतूद करण्यात यावी याकरिता व महाराष्ट्र प्रदेश सरचिणीस सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांच्या नेतृत्वाखाली मा.ठाणेदार साहेब मेहकर यांच्या मार्फत मा. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई. मा. देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई. यांना निवेदन देवुन मेहकर येथे स्थानिक नागरिक व महिला आघाडीच्यावतिने निषेध व्यक्त करत बदलापुर व अकोला जिल्हातील बाळापुर तालुक्यातील काजीखेड अश्या प्रकारच्या विवीध लैंगीक अत्याचाराचे प्रकार महाराष्ट्रामध्ये घडत आहेत पण कुठेतरी प्रशासनाकडुन व गृह खात्याकडून नरमाईची भुमीका विवीध प्रकरणामध्ये दिसून येत आहेत. अशा नराधम कृत्य करणाच्या आरोपीला फाशीची शिक्षा किंवा अदाखल पात्र गुन्हा तरी नोंदविण्यात यावा म्हणजे जेणेकरून प्रशासनाला धाक राहणार व शाळकरी लाहान मुलांना शाळेत पाठविण्याच्या पहिले पालकांना भीती वाटणार नाही. अशा प्रकारचे वातावरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये प्रस्तापीत व्हावे.आशी मागणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या व सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतिने संपुर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल यांची प्रशासनाने दक्षता घ्यावी.
यावेळी, प्रकाश सुखधाने, अख्तर कुरेशी, सुनिल मोरे, गजानन सरकटे, कुणाल माने, हसन गवळी, आजम कुरेशी, राधेशाम खरात, दुर्गादास अंभोरे, महेंद्र वानखेडे, सुनिल खंडारे, राहुल बोरकर, महिला आघाडी लक्ष्मीताई कस्तुरे, जाकेरा बी शेख, प्रतिभा गवई, कांंचन मोरे,राधा यंगड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेेच मेहकर येथील पत्रकार बांधव व नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या