Ticker

6/recent/ticker-posts

संतोष आठवले यांना राज्यस्तरीय समाजरत्न गौरव पुरस्कार प्रदान


संजय देशमुख चित्रा न्युज
कोलहापुर :- . पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष एस आठवले यांना राज्यस्तरीय समाजरत्न गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले .

कोल्हापुर येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पुणे न्युज एक्सप्रेस च्या वतीने ज्येष्ठ विचारवंत प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते शाल , पुष्पगुच्छ , सन्मान चिन्ह ,मानपत्र देऊन गौरविण्यात आले पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पुणे न्युज एक्सप्रेसचे संपादक मेहबुब सर्जेखान होते .
 सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात आपण करीत असलेल्या निस्वार्थी समाजसेवा मोलाची भर घालणारी आहे .विविधतेतून एकता व ऐक्य जोपासण्याची सांस्कृतिक परंपरा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये रुजवत आहात . राज्यघटनेची समता व बंधुता ही तत्वे प्रमाणभूत मानून सामाजिक व धडाडीने समाजसेवा करण्याची तळमळ या गुणांचा आणि निष्ठावंत जागरूक नागरिक म्हणून आपण कार्यान्वित आहात . आपले हे कर्तृत्व अत्यंत अभिनंदन आणि अनुकरणी आहे . समाजासाठी तुम्ही एक प्रेरक शक्ती आहे .त्याकरता आम्ही या राष्ट्रीय कार्यक्रमाचे औचित्य साधून एक छोटासा पण जिव्हाळ्याचा व आपुलकीचा सन्मान करीत असल्याचे सन्मानपत्र त्यांना देण्यात आले आहे .

 यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पँथर आर्मी चे संस्थापक राष्ट्रीय नेते फिरोज मुल्ला सर , ध्यानसंवाद वृत्तपत्राचे ज्येष्ट संपादक सागर बोराडे , घर प्रमुख चे संपादक धोंडीराम शिंदे , प्रगत हिंदुस्थान चे संपादक दिपक ढवळे , विरभ्रद अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चे संस्थापक चेअरमन संतोष जंगम ,  श्रीकांत कांबळे आदी उपस्थित होते . प्रारंभी स्वागत सौ प्रमोदिनी माने यांनी केले तर आभार मुरलीधर कांबळे यांनी मानले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या