Ticker

6/recent/ticker-posts

गप्पी मासे सोडण्याची धडक मोहीम

रुपाली डोंगरे चित्रा न्युज 
अमरावती :-प्रा.आ.केंद्र तळेगाव ठाकूर व राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण उपपथक तिवसा,ता.तिवसा,जि.अमरावती यांच्या मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव ठाकूर अंतर्गत गावामध्ये कायमस्वरूपी व तात्पुरत्या डासोत्पत्ती स्थानांमध्ये हिवताप,हत्तीरोग,डेंग्यू,चिकन गुनिया या किटकजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी विविध ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले.
   जैविक उपायोजनेअंतर्गत किटकजन्य आजार नियंत्रणाकरीता अळीभक्षक गप्पी माशांचा वापर करण्यात येतो. साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडल्यास ते डासांच्या अळ्यांचे भक्षण करून डासाची घनता कमी करण्यास मदत करतात. गप्पी मासे सर्व प्रकारच्या डास अळ्यांचे भक्षण करतात त्यामुळे हिवताप व हत्तीरोग निर्मूलन कार्यक्रमांमध्ये मदत म्हणून ही मोहीम राबविल्या जाते अशी माहिती व आरोग्य शिक्षण देण्यात आले.
          ही मोहीम मा.उपसंचालक डॉ.कमलेश भंडारी,मा.जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.शरद जोगी,मा.हत्तीरोग अधिकारी श्री.दिनेश भगत,डॉ.जुनेद व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील राठोड,अंशुला बोदले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
      गप्पी मासे धडक मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य निरीक्षक श्री.विठ्ठल राठोड,श्री विनोद बहादुरकर,श्री निवृती काळपांडे आरोग्य कर्मचारी श्री.रोशन खरकाळे,सीताराम वाळले,वंदन आळे,विजय साळूके,प्रफुल भालेराव,श्रीकांत उगले,उल्हास दाभाडे,अरविंद वाणखडे,राजू वाघ,धूर्वे काका नियमित क्षेत्र कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या