कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :- ग्रामपंचायतींमध्ये आँनलाईन कामाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याला सलग दोनदा “डिजीटल महाराष्ट्र पुरस्कार” मिळवून देणाऱ्या संगणक परिचालकाचा कंपनीचा करार संपल्यामुळे माहे जून २०२४ पासून बेरोजगार झाले असून, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. लाखांदूर तालुक्यातील संगणक परिचालकाच्या समस्या बाबद भंडारा जिल्हा सचिव भाजप डॉ. विजया ठाकरे नंदुरकर यांच्या नेर्तृत्वात विधान परिषद सदस्य आमदार डॉ. परिणय फुके यांच्या लाखनी येथील निवासस्थानी यांना(ता.२५) रोज रविवारला निवेदन देण्यात आले. ग्रामपंचायतींचे संगणक परिचालक मागिल अनेक वर्षापासून केवळ सहा हजार रूपये मानधन तत्वावर काम करीत असून, ते देखील सहा - सहा महिणे मिळत नाही. या संगणक परिचालकांना उद्योजक असे संबोधिल्या जात असल्यामुळें त्यांना शासन सेवेत देखील सामावून घेतल्या गेले नाही. त्यामुळे उदरनिर्वाहचा समस्या निर्माण होऊन बेरोजगाराची परिस्थिती निर्माण झाली आहे.
समस्यांचे निराकरण करण्यासाठी यावेळी आमदार डाँ. परीणय फुके यांनी संबंधित विभागांचे सचिव यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून चर्चा केली व संगणक परिचालकांना समस्यांबाबद राज्याचे लोकप्रीय नेते, उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासित केले आहे. तसेच आपले सरकार सेवा केंद्राचे तालुका व्यवस्थापक व ग्रा.पं. संगणक परिचालक यांच्या मागण्यांसाठी एकञीत बैंठक लावणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी भंडारा जिल्हा सचिव भाजप डॉ. विजया ठाकरे नंदुरकर, जितेंद्र ढोरे, परमेश्वर तेलमासरे, विनायक हुमने, प्रमोद नागमोती, चेतन भेंडारकर उपस्थित होते. जिल्ह्यातील संघटित तसेच असंघटित कर्मचाऱ्यांसाठी समस्या सोडवण्यासाठी सतत धावपळ करीत असल्याने डॉ. विजया ठाकरे नंदुरकर यांचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.
0 टिप्पण्या