• सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांची मागणी
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :-लाखनी तालुक्यातील सालेभाटा आणि परिसरात ५ तलाठी साझे असून काही लाखनी तर काही पिंपळगाव महसूल मंडळाला जोडलेले असल्यामुळे शेतकऱ्यांची कामे वेळेवर होत नाही. तसेच जनतेला कामानिमित्त अकारण पायपीट करावी लागते. जनतेच्या सोयीचा विचार करून सालेभाटा येथे महसूल मंडळ स्थापन करून मंडळ अधिकारी कार्यालयास सुरुवात करावी. तसेच पर्जन्य मापक यंत्र बसविण्यात यावे. अशी सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांनी केली आहे.
सालेभाटा परिसरात लाखोरी, सालेभाटा, मोरगाव, केसलवाडा/पवार आणि गोंडसावरी हे ५ तलाठी साझे असून यात २० ते २२ गावे समाविष्ट आहेत. त्यापैकी ३ गावे रीठी असून बाकीची लोकवस्तीची आहेत. मंडळ अधिकारी कार्यालयातून शेतकऱ्यांची शेती विषयक फेरफार तथा २ शेतकऱ्यांतील वाद प्रकरणी चौकशी चे काम तसेच अवैध गौण खनिज उत्खननावर लक्ष ठेवणे. या शिवाय शासनाने नेमून दिलेली कामे करण्याची जबाबदारी मंडळ अधिकाऱ्यावर असते. सालेभाटा परिसरात ५ तलाठी साझे असले तरी काही तलाठी साझे पिंपळगाव/सडक तर काही तलाठी साझे लाखनी महसूल मंडळास जोडण्यात आलेली आहेत. मोरगाव तलाठी साझ्यातील निलागोंदी व मुंडीपार/सिंदीपार ही तालुक्यातील शेवटची गावे असून त्यांना मंडळ अधिकारी कार्यालयातील कामानिमित्त पिंपळगाव/सडक येथे यावे लागते. हे अंतर अंदाजे १२ ते १५ किमी असल्यामुळे शेतकऱ्यांना अनावश्यक वेळ आणि पैशाचा अपव्यय करावा लागतो. या परिसरात दळणवळणाच्या साधनांचा अभाव असल्याने वेळेवर पोहचता येत नाही. त्यामुळे कामे वेळेवर होतीलच याची शास्वती नसते. सालेभाटा परिसरातील शेतकऱ्यांच्या सोयीचा विचार करून सालेभाटा येथे महसूल मंडळ स्थापन करून मंडळ अधिकारी कार्यालयास सुरुवात करावी. तसेच पर्जन्य मापक यंत्र बसविण्यात यावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांनी केली आहे.
0 टिप्पण्या