Ticker

6/recent/ticker-posts

पालांदूर पोलिस ठाण्यात ४ वर्षात ८ ठाणेदार !

• रेती तस्कर व अवैध व्यवसायिकांना सुगीचे दिवस येणार

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :-लाखनी तालुक्यातील चुलबंद नदी खोऱ्यात असलेल्या पालांदूर पोलिस ठाण्यात मे २०२० पासून आतापर्यंत ८ ठाणेदारांची नियुक्त करण्यात आल्यामुळे नियमित ठाणेदाराअभावी रेती तस्करी व अवैध धंद्यावर आळा घालण्याचे सौजन्य दाखविले गेले नाही. या ठिकाणी नियमित ठाणेदाराची नियुक्ती करण्यात यावी. अशी गावकऱ्यांकडून  मागणी होत आहे. 
                   पालांदूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चुलबंद नदी प्रवाहित होत असल्यामुळे नदी पात्रात अनेक रेतिघाट आहेत. पण शासनाने रेती घाटाचे लिलाव केले नसल्यामुळे पोलिसांच्या आशीर्वादाने रेती तस्करांकडून अवैध रेती उत्खनन तथा ओव्हरलोड रेती वाहतूक खुलेआम सुरू असून तहसीलदार व महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यास रेती तस्कर मागे पुढे पाहत नाही. अवैध धंद्याचा ग्राफ वाढण्याचे मार्गावर असल्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होण्याचे मार्गावर आहे. पालांदूर पोलिस ठाण्यात मे २०२० मध्ये एपीआय अंबादास सूनगार यांचे स्थानांतरण झाले. त्यांचे जागेवर एपीआय दीपक पाटील रुजू झाले. सुशिक्षित बेरोजगार युवकांना पोलिस भरती बाबद मार्गदर्शन व पोलिस ठाणे परिसरात लेखी परीक्षा सुरू केल्याने ते अल्पावधीतच लोकप्रिय होण्याचे मार्गावर असताना नोव्हेंबर २०२० त्यांची बदली करण्यात आले. त्यांचे जागेवर वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज सिडाम यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचेही जुलै २०२१ मध्ये स्थानांतरण करण्यात आले. त्यांचे जागेवर एपीआय तेजस सावंत रुजू झाले. त्यांनी अवैध व्यवसायावर वचक बसविण्यास सुरुवात केली असता जानेवारी २०२२ मध्ये त्यांचेही स्थानांतरण करण्यात करून त्यांचे जागेवर एपीआय बोरकुटे रुजू झाले. त्यांनी खूनारी हत्या प्रकरणात २४ तासांत आरोपीच्या मुसक्या आवळून योग्य रीतीने जबाबदारी पार पडली. तथा पोलिस ठाण्याच्या कामकाजात सुधारणा करण्याचे प्रयत्नात असताना २२ एप्रिल २०२२ रोजी त्यांचे पोलिस ठाणे अड्याळ येथे स्थानांतरण करून त्यांचेजागेवर लाखांदूर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विरसेन चहांदे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचेही जानेवारी २०२४ रोजी पवनी येथे स्थानांतरण करण्यात आले. त्यांचे जागेवर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील राऊत २६ जानेवारी २०२४ ला रुजू झाले ७ महिन्यातच त्यांचे आंधळगाव येथे स्थानांतरण करण्यात आले. त्यांचे जागेवर सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक सोनवाने १७ ऑगस्ट २०२४ रोजी पालांदूर पोलिस ठाण्यात रुजू झाले. यातील काही अपवाद वगळता बहुतेक ठाणेदारांना ६ महिन्यापेक्षा अधिक कालावधी मिळाला नसल्यामुळे रेती तस्करी व अवैध व्यवसायांना आळा घालता आला नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन पोलिस ठाणे पालांदूर येथे नियमित ठाणेदार नियुक्त करणे गरजेचे झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या