Ticker

6/recent/ticker-posts

वंचित चे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांची उपोषण स्थळी भेट

कर्तव्यात दिरंगाई करणाऱ्या ग्रामसेवक व संबंधित  अधिकाऱ्यावर निलंबनाची कार्यवाहीची मागणी

रुपाली मेश्राम चित्रा न्युज 
जालना: मंठा तालुक्यातील तळणी येथील बौद्ध विहार जवळील अतिक्रमण हटवण्यासाठी आंबेडकरी अनुयायांनी दिनांक १४ ऑगस्ट २०२४ पासून मंठा पंचायत समिती कार्यालया समोर उपोषण सुरू केले आहे. दिनांक १९ ऑगस्ट २०२४ रोजी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांनी उपोषणस्थळी भेट धावती भेट दिली आणि  वंचित बहुजन आघाडी आपल्या सोबत खंबीरपणे उभी आहे हा विश्वास उपोषणकर्त्यांना दिला.

उपोषणाचा ६ वा दिवस आहे. उपोषणार्थ्यांनी मागील १ वर्षापासून अतिक्रमण हटवण्यासाठी निवेदन देऊन पाठपुरावा केला होता. प्रशासनाचे अतिक्रमण हटवण्यासाठी आदेश दिले आहेत. तरी सुद्धा ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, गट विकास अधिकारी कर्तव्यात कसूर करत आहेत आणि जाणीवपूर्वक दिरंगाई करत आहेत. यामुळे संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. 

यावेळी तालुकाध्यक्ष सुभाष जाधव यांच्या सह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या