राजेश येसेकर भद्रावती / वरोरा
भद्रावती / वरोरा : बनावट, बोगस, दस्तऐवज न तपासता, चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर येथील अधिकारी यांनी अमोल गौतम कातकर या बदमाशाला नौकरी दिलीच कशी? असा सवाल विनोद खोब्रागडे यांनी अधिकारी यांना केला आहे.
असे बोगस व बनावट दस्तऐवज तयार करून,मुळ ५२ गावांतील प्रकल्पग्रस्त नसलेले १००-१५० मुले मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करुन नौकरी करीत आहे,हा मोठा महाघोटाळा आहे.
चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर येथील अधिकारी , मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करुन, शेकडो बोगस प्रकल्पग्रस्त मुलांना कायमस्वरूपी नौकरी कशी काय दिली.?
पोलिस प्रशासन यांना गंभीर रिपोर्ट, पुराव्यानिशी देऊनही चुपचाप का आहेत?
त्यांचाही हात या महाघोटाळ्यात आहे काय, अशी शंका निर्माण झाली आहे,
या प्रकरणाची सखोल चौकशी CBI,ED,ACB,SIT, मार्फत करावी अशी मागणी पत्रकार परिषदेत विनोदकुमार खोब्रागडे यांनी केली आहे.
ज्याप्रमाणे पुजा खेडेकर या बोगस दस्तऐवजचा आधारे IAS बनल्यानंतर,व ते प्रकरण माहिती चां अधिकारात नुकतीच उघड झाल्यानंतर,व इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रेस मीडिया यांनी लावुन धरल्यामुळे,त्यांचावर दिल्ली पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ४२०,४६४,४६५,४६८,४७०, नुसार FIR दाखल झाला, नंतर नौकरी ही गेली, नंतर अंतरिम जामीन सुद्धा पटियाला कोर्टाने फेटाळले आहे, आता तिला बोगस दस्तऐवज तयार करण्यास मदत करनारे सहा अधिकारी विरुद्ध फौजदारी कारवाई होणार आहे.
त्याअर्थी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील मौजा गुळगाव येथील अमोल गौतम कातकर हा रहिवासी नसतानाही,व तो मुळांचा छोटा नागपूर येथील रहिवासी असतांनाही,त्यांचे वडील गौतम कातकर हा CSTPS चंद्रपूर येथे नौकरी करीत असताना, त्यांनी आपले वार्षिक उत्पन्न ७-८लाख रुपये असतांना ही,२०,०००/- विस हजार रुपयांचे उत्पन्न दाखवुन बोगस रेशनकार्ड तयार करने, खोटे शपथपत्र तयार करने, दादाजी लक्ष्मण कातकर हे निपुत्रिक असतांना त्यांचे पुत्र,सुन,नातु दाखविले,व दादाजी लक्ष्मण कातकर यांचे "प्रपत्र"आपल्या नावाने करून नौकरी करीत आहे.
हा सर्व गंभीर प्रकार चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर येथील अधिकारी यांना माहिती असतानाही त्यांनी कुठलीही अँक्शन अमोल गौतम कातकर यांचावर केली नाही.
म्हणून मुख्य आरोपी, मुख्य अभियंता श्री.गिरीश कुमरवार चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर व डायरेक्टर आभा शुक्ला, डॉ.पी.अनबालगन, संजय मारुटकर, धनंजय सावलकर सह बोगस दस्तऐवज तयार करून नौकरी करीत असलेला अमोल गौतम कातकर, गौतम कातकर, शकुंतला गौतम कातकर यांचावर फौजदारी कारवाई करन्यासाठी पोलिस प्रशासन यांना गंभीर रिपोर्ट पुराव्यानिशी देऊनही ,पोलिस प्रशासन FIR कधी दाखल करनार आहेत?
महाराष्ट्र शासन यांनी कोर्टात नाचक्की होन्यापुर्वी पोलिस प्रशासन यांना निर्देश देण्यात यावे अशी मागणी पत्रकार परिषदेत केली आहे.
माहितीचा अधिकारात जनमाहिती अधिकारी चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर यांनी १ ते ९ मुद्यावर माहिती न दिल्यामुळे, पनवेल नवी मुंबई प्रमाणे FIR रजीष्टर करन्यासाठी अपील केली आहे.
नवीन कायद्यानुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अधिनियम २०२३ नुसार "दखलपात्र" गुन्ह्यांत तक्रार दिल्यानंतर तात्काळ किंवा तिन दिवसांत पोलीसांनी अँक्शन घ्यावी,असा कायदा सांगतो, त्यामुळे पोलिस प्रशासन यांनी तात्काळ गुन्हा दाखल करावे, अन्यथा पोलिस अधीक्षक चंद्रपूर, ठानेदार भद्रावती यांच्या वर सुद्धा थेट कोर्टात फौजदारी पीटिशन दाखल करण्यात येईल अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.
फिर्यादी:-विनोदकुमार खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक तलाठी पटवारी तथा प्रकल्पग्रस्त तथा RTI कार्यकर्ते वरोरा- चंद्रपूर यांचा पत्रकार परिषदेत रोखठोक सवाल?
ज्याअर्थी पुजा खेडेकर (फर्जी IAS ) यांनी बोगस दस्तऐवज तयार करून नौकरी मिळविली होती,तिच्यावर कलम ४२०,४६४,४६५,४६८,४७०, नुसार FIR दाखल झाला,अंतरिम जामीन सुद्धा पटियाला दिल्ली कोर्टाने काल खारीज केला आहे.
दिनांक १७/०७/२०२४ रोजी क्राईम ब्रॅन्च नवी दिल्ली यांनी पुजा खेडेकर या बोगस (IAS) अधिकारी विरुद्ध भारतीय दंड संहिता १८६०च्या कलम ४२०,४६४,४६५,४७०, नुसार फौजदारी गुन्हा दाखल झाला होता.
त्यानंतर दिनांक १८/०७/२०२४ ला UPSC आयोगाने नोटीस इशु करुन दिनांक ३०/०७/२०२४ पर्यंत उत्तर दिले नाही.
दिनांक ३१/०७/२०२४ रोजी पुजा खेडेकर यांना नौकरीतुन मुक्त केले,व पुढे परीक्षा देन्यासही मनाई केली आहे.
दिनांक ०१/०८/२०२४ रोजी पटियाला दिल्ली कोर्टाने पुजा खेडेकर यांच्या अंतरिम जामीन खारीज केला आहे.
ज्याअर्थी पुजा खेडेकर हिने बोगस दस्तऐवज तयार करून IAS ची नौकरी मिळविली होती, अखेर तिच्यावर FIR दाखल होऊन,काल नौकरीतून काढून टाकले आहे, अंतरिम जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने रद्द केले आहे.
त्याचप्रमाणें चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर येथे बोगस दस्तऐवज तयार करून नौकरी करीत असलेला अमोल गौतम कातकर यांचावर तात्काळ FIR रजीष्टर करून नौकरी तुन बडतर्फ मुख्य अभियंता चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर यांनी का केले नाही?
या बदमाश अमोल गौतम कातकर व त्यांच्या वडिलांनी बोगस दस्तऐवज तयार करून नौकरी कसे काय करीत आहेत, या आरोपींनी नौकरी मिळविण्यासाठी माझे सख्खे मामा दादाजी लक्ष्मण कातकर हे निपुत्रिक असतांना त्यांच्या अज्ञानाचा व वयोवृद्धाचा गैरफायदा घेऊन,कुठलेही रक्ताचे नातेसंबंध नसतानाही, गौतम कातकर यांनी स्वतः दादाजी लक्ष्मण कातकर यांचा ४६ वर्षांचा मुलगा राशन कार्ड वर दाखविले, तसेच तो चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर येथे नौकरी करीत असतांना वार्षिक ७-८ लाख रुपये उत्पन्न असतांना फक्त २०,०००/- विस हजार रुपयांचे उत्पन्न राशन कार्ड वर दाखविले, पत्नी शकुंतला गौतम कातकर हिला दादाजी लक्ष्मण कातकर यांची सुन राशन कार्ड वर दाखविले, आणि अमोल गौतम कातकर याला दादाजी लक्ष्मण कातकर यांचे नातू दाखविले, अशाप्रकारे खोटे व बनावट राशन कार्ड तयार केले, त्यानंतर शपथपत्र करुन दादाजी लक्ष्मण कातकर यांचा नावाने प्रपत्र होते ते आपल्या नावाने तयार केले,व चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर येथे मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करुन नौकरी करीत आहे.
सेम पुजा खेडेकर प्रमाणे बोगस दस्तऐवज तयार करून नौकरी करीत आहे, त्यामुळे अमोल गौतम कातकर, वडील गौतम कातकर, आई शकुंतला कातकर त्यांचावर तात्काळ IPC कलम१२०ब, ४२०,४६४,४६५,४६८,४७०,४७१,३४, नुसार तसेच इंम्फारमेशन टेक्नॉलॉजी ऑक्ट कलम ८९,९१, नुसार फौजदारी कारवाई करावी अशी तक्रार पोलीस अधीक्षक चंद्रपूर व उपविभागीय पोलिस अधिकारी वरोरा, ठानेदार साहेब भद्रावती यांना दिली आहे.
हि माहिती माहीतीचा अधिकारात, विनोद खोब्रागडे यांना माहिती मिळताच त्यांनी पोलिस प्रशासन यांना गंभीर रिपोर्ट दिली आहे.
दिनांक 31/07/2024 रोजी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद मध्ये समजावून सांगितले आहे.
या प्रकरणात सखोल चौकशी झाल्यास शेकडो बोगस मुले चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर येथे १५-२० लाख रुपये भरून नौकरी करीत आहेत अशी गोपनीय माहिती समोर आली आहे.
५२ गावांतील ११,७०० एकर जमीन इरई धरना साठी भुसंपादीत झाली होती, मात्र तिथल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मुलांना आजही कायमस्वरूपी नौकरी दिली नाही, आणि फुकटे बोगस मुले लाखो रुपये अधिकारी यांना देऊन नौकरी करीत आहेत हा प्रकल्पग्रस्त वर अन्याय आहे.
हा अन्याय कदापी आम्ही सहन करणार नाही.
आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे मनमानीचे नाही हे चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर येथील अधिकारी यांनी लक्षात घ्यावे.
आरोपी मुख्य अभियंता चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर श्री . गिरीश कुमरवार व इतर ४ वरिष्ठ अधिकारी यांना १ते९मुद्यावर माहितीचा अधिकारात माहिती मागितली असता माहिती दिली नाही म्हणून त्यांचावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी प्रकल्पग्रस्त शेतकरी विनोदकुमार खोब्रागडे यांनी पोलिस प्रशासन यांना गंभीर रिपोर्ट दिली आहे.
पोलिस प्रशासन यांना गंभीर रिपोर्ट दिली आहे नविन कायदा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अधिनियम २०२३ नुसार तक्रार दिल्यानंतर दखलपात्र गुन्ह्यांत तात्काळ किंवा तिन दिवसांत कारवाई करावी असे निर्देश आहेत पोलिस प्रशासन यांनी तात्काळ अँक्शन घ्यावी असे विनोद खोब्रागडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले


0 टिप्पण्या