सम्यक घुले यवतमाळ
यवतमाळ :-बदलापूर येथील आदर्श महाविद्यालय झालेल्या बाल लैंगिक अत्याचार घटनेचा तीव्र संताप संपूर्ण महाराष्ट्रसह देशात व्यक्त केला जात आहे. या घटनेचे पडसाद अकोला बाजार येथे जिल्हा परिषद हायस्कूल, व केंद्र प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावात निषेध रॅली काढून बदलापूर घटने विरुद्ध आपला संताप व्यक्त केला.
यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेपासून ते पूर्ण गावातील मुख्य रस्त्या पर्यन्त रॅली काढून घोषणा दिल्या तर जागृतेचा संदेश देत प्रत्येकाने सजग राहावे असे हाती बॅनर घेऊन प्रबोधन नारे देण्यात आले. अश्या समाज मन ढवळुन काढणाऱ्या
बाल लैंगिक अत्याचार घटना रोखण्यासाठी शाळेतील शिक्षिका संगीता शिंदे यांनी मुख्याध्यापक नासिर खान यांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूर घटनेच्या निषेध रॅलीचे आयोजन केले. तसेच विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा, चाईल्ड हेल्पनंबर, शाळेतील तक्रार पेटीचा वापर व स्वंय सुरक्षा कशी करावी याविषयी शिक्षकांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या आणि रॅलीच्या यशस्वीतेसाठी कनाके, कचरे, उरकुडे, चंद्रे, राऊत, कडू, अमृता यांनी तसेच रुपेश माळवी यांनी विशेष सहकार्य केले. यात गावातील नागरिकांचा सुद्धा सहभाग दिसून आला..
0 टिप्पण्या