Ticker

6/recent/ticker-posts

स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या वतीने घाटकोपर चिरागनगर पोलीस स्टेशन मध्ये मोफत मेडिकल कॅम्प


संस्थापक अध्यक्ष दीपक कांबळे सर मुख्य महासचिव कमलेश शेवाळे सर आणि विश्वस्त धनश्री ताई उत्पात यांच्या मार्गदर्शनाखाली.! 

सोनू संजीव क्षेत्रे चित्रा न्युज

घाटकोपर-  घाटकोपर तालुका अध्यक्ष नंदकुमार तांबे यांच्या  सहकार्याने मुंबई विभाग अध्यक्षा सविता तावरे आणि मुंबई पदाधिकारी यांनी ऊन, पाऊस, सण, उत्सव यांची पर्वा न करता रात्रदिवस जनतेच्या सुरक्षेसाठी तत्पर असणाऱ्या पोलीस बांधवांच्या कार्याची दखल घेत घाटकोपर पोलीस स्टेशन मध्ये आज २५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी मोफत मेडिकल कॅम्प आयोजित केला होता. या मोफत आरोग्य तपासणी मध्ये डॉ. मोरफेन कंपनीतर्फे मोफत बीपी व शुगर तपासणी करण्यात आली. तर बॉडी चेकअप साठी डॉ. प्रशांत सोनवणे, डॉक्टर कोमल सोनवणे, डॉक्टर शुभम बोऱ्हाडे, डॉ. हर्षाली पाटील यांनी आपले योगदान दिले. या कार्यक्रमाबरोबरच स्वराज्य पोलीस मित्र संघटनेच्या वतीने लैंगिक अत्याचाराच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये  घेण्यात आली. या सर्व कार्यक्रमास पोलीस प्रशासनाने आम्हाला नेहमी प्रमाणेच अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य  केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व डॉक्टरांना संघटनेची ट्रॉफी देऊन सन्मानित केले तसेच घाटकोपर पोलीस स्टेशनचे सीनियर पी आय  बळवंत देशमुख साहेब यांची ट्रॉफी पवार मॅडम आणि जबीर साहेब यांना देऊन सन्मानित केले. तसेच कार्यक्रमांमध्ये मदत करणाऱ्या सर्व नर्स आणि विशेष कार्यकर्त्यांना संघटनेच्या वतीने सन्मानचिन्ह देण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये संघटनेचे मुंबई विभाग अध्यक्ष सविता तावरे, मुंबई विभाग संघटक वैशाली कांबळे, घाटकोपर तालुका अध्यक्ष नंदकुमार तांबे, घाटकोपर तालुका उपाध्यक्ष संतोष हाडवळे, विक्रोळी तालुका अध्यक्ष संजीवनी लोखंडे, ईशान्य मुंबई जिल्हा सरचिटणीस मंगल शिंदे, ईशान्य मुंबई सह संघटक दिपाली तांबे, विक्रोळी तालुका उपाध्यक्ष लता कांबळे, बांद्रा तालुका संपर्कप्रमुख प्रमिला थोरात , बांद्रा तालुका संघटक संगीता पवार, उत्तर मध्य मुंबई जिल्हा प्रभारी नवनाथ शेजवळ, उत्तर मध्य मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष सिद्धार्थ गज्जेली, सुरेश दादा सोनवणे, विशाल डुंबरे, प्रवीण तांबोळी हे सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या