Ticker

6/recent/ticker-posts

प्रताप काॅलेज येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याता मा.श्री.गणेशजी शिंदे यांचे "हे जीवन सुंदर आहे'. या विषयावर व्याख्यान उत्साहात संपन्न


पंकज पाटील चित्रा न्युज

जळगाव :- अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप काॅलेज येथे महाराष्ट्राचे प्रसिद्ध व्याख्याता मा. श्री.गणेशजी शिंदे यांचे  'हे जीवन सुंदर आहे'. व्याख्यान मोठ्या उत्साहात पार पाडले.?कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. जितेंद्र झाबक यांनी स्वीकारले. यानंतर सर्व प्रथम भारतीय संस्कृती प्रमाणे दीप  प्रज्वलन आणि प्रतिमा पुजन केले गेले. प्रास्ताविक महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. अरुण जैन यांनी केले. प्रास्ताविकानंतर कार्याउपाध्यक्ष मा. श्री निरंज भाऊ अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा. श्री. गणेशजी शिंदे यांनी व्याख्यानातुन विद्यार्थांना मार्गदर्शन केले. विद्यार्थांना सांगितले की *हवाओं से कह दो कि अपनी औकात में रहे हम परों से नहीं हौसलो से उड़ा करते है'* त्यांनी जीवन जगणे किती सुंदर आहे हे आपल्या प्रभावशाली भाषेत समजवले. अनेक लहान लहान उदाहरणातून पटवून दिले. सर्वात शेवटी विद्यार्थांना सांगितले गरीबीत जन्माला आलो ही आपली चूक नाही पण गरीबीत मेलो तर ही आपली चुक आहे. कार्यक्रमाला खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. जिंतेद्र झाबक, मा. कार्याउपाध्यक्ष निरंज अग्रवाल, मा.संचालक योगेश भाऊ मुदंडे, मा. ज्येष्ठ संचालक हरी अण्णा वाणी, विश्वत मा. सौ. वसुंदरा लाडगे मॅडम, उपाध्यक्ष मा सौ. माधुरी पाटील, मा. उपाध्यक्ष देशमुख सर, फार्मसी काॅलेजचे प्राचार्य मा.  डॉ. सोनवणे सर व  मा. माजी प्राचार्य डॉ एस आर चौधरी , मा.माजी चिटणीस प्रा. खोडके सर उपस्थित होते. मुख्याध्यापक, प्राध्यापक, विभाग प्रमुख शिक्षक व पालक वर्ग जि.एस. हास्कुलचे विद्यार्थी, डी.आर.कन्या शाळेच्या विद्यार्थीनी, प्रताप हास्कुलचे विद्यार्थी, पी.बी.ए.शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थींनी, डी. व बी. फार्मसी व प्रताप कॉलेज चे विद्यार्थी व विद्यार्थीनी, सर्व कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन प्रा. नितीन पाटील, सुञसंचलन डाॅ.संदिप नेरकर यांनी केले. सर्वात शेवटी सर्वानी स्वच्छ भारत अभियाना अतंर्गत शपथ घेतली व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या