🌞 दिन विशेष 🌞
इसवी सन २०२४ - २४आॕक्टोबर
शालिवाहन शक १९४६, विक्रम संवत २०८०
भा. रा. २ कार्तिक १९४६.
युगाब्द ५१२६
संवत्सर नाम : क्रोधी
अयन: दक्षिणायण
ऋतू : शरद
मास : आश्विन
पक्ष : कृष्ण
तिथी : अष्टमी (२६.००) ~ नवमी
वार : गुरूवार
नक्षत्र: पुष्य (अहोरात्र) ~ आश्लेषा
राशी : कर्क
*कालाष्टमी*
*कराष्टमी*
*गुरूपुष्यामृत संपूर्ण दिवस शुक्रवारी सूर्योदयापर्यंत (६.३८)*
*संयुक्त राष्ट्र दिन*
*जागतिक माहिती विकास दिन*
*जागतिक पोलियो दिन*
१८५१: विल्यम लसेल यांनी युरेनस ग्रहाच्या अंब्रियाल व अरीयेल चंद्राचा शोध लावला.
१८५७: शेफील्ड एफ.सी. हा जगातील सर्वात जुना फुटबॉल क्लब शेफील्ड, इंग्लँड येथे सुरु झाला.
१९०१: एनी एडसन टेलर नायगारा ञधबधब्यात बॅरल मधून उडी मारणारी पहिली व्यक्ती.
१९०९: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅ. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये प्रथमच दसर्याचा उत्सव साजरा केला.
१९४५: संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली.
१९४९: युनायटेड नेशन्सच्या मुख्यालयाचे काम सुरु झाले.
१९६३: देशात असलेल्या दुष्काळामुळे सार्वजनिक व मोठया समारंभात तांदळाच्या पदार्थावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.
१९६४: उत्तर र्होडेशियाला युनायटेड किंगडमपासुन स्वातंत्र्य मिळाले व त्याचे झांबिया असे नामकरण करण्यात आले.
१९८४: भारतामधे प्रथमच भुयारी रेल्वे कोलकाता येथे सुरू झाली.
१९९७: सतारवादक पंडित रविशंकर यांना संगीतक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जपानचा ’प्रिमियम इंपिरिअल आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान.
२००२: सलमान खान याचा पुन्हा जामीन मंजूर आणि सुटका.
२००३: कॉनकॉर्ड विमानाचे शेवटचे व्यावसायिक उड्डाण झाले.
२०१६: सायरस मिस्त्री यांची टाटा समूहाच्या चेअरमन पदावरून हकालपट्टी.
जन्मदिवस
१७७५: दिल्लीचा शेवटचा बादशहा बहादूरशहा जफर
१८६८: भवानराव श्रीनिवासराव तथा ’बाळासाहेब’ पंतप्रतिनिधी – औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार तसेच व्यायामविषयक पुस्तकांचे कर्ते
१९१०: मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री लीला ऊर्फ माई भालजी पेंढारकर.
१९११: स्वातंत्र्यसैनिक व समाजवादी नेते, अशोक मेहता
१९१४: आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल
१९२१: व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण, पद्मभूषण (१९७१), रॅमन मॅगसेसे (१९८४), पद्मविभूषण (२००५) इत्यादि पुरस्कारांचे मानकरी
१९२६: सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर केदारनाथ सहानी
१९३५: भारतीय पत्रकार आणि लेखक मार्क टुली.
१९६३: भारतीय अमेरिकन उद्योगपती अरविंद रघुनाथन
१९७२: अभिनेत्री व मॉडेल रीमा लांबा, ऊर्फ मल्लिका शेरावत.
मृत्यूदिन
१९२२: कॅडबरी चे संस्थापक जॉर्ज कॅडबरी
१९४४: रेनॉल्ट कंपनी चे संस्थापक लुई रेनॉल्ट
१९९१: स्टार ट्रेक चे निर्माते जीन रोडडेबेरी
१९९१: ऊर्दू कथा व पटकथा लेखिका इस्मत चुगताई
१९९२: अरविंद गोखले – मराठी नवकथेचे जनक, ’गंधवार्ता’ या त्यांच्या कथेला आशियाई-अरबी-अफ्रिकी कथा स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले. भारतीय उपखंडातील प्रसिद्ध लेखकांच्या लघुकथांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना १९८४ मधे केंद्र सरकारची फेलोशिप मिळाली होती.
१९९५: पत्रकार, भारतीय श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष माधवराव साने.
२०११: लिस्प प्रोग्रॅमिंग लँग्वेज चे जनक जॉन मॅककार्थी
२०१३: ख्यातनाम पार्श्वगायक प्रबोधचंद्र तथा मन्ना डे. ’सीमा’, ’बरसात की रात’, ’दो बिघा जमीन’, देख कबीरा रोया’ आदी चित्रपटांतील त्यांची गाणी गाजली होती.
२०१७: पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार तसंच, संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित बनारस घराण्याच्या सुप्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायिका गिरीजा देवी.
*।। दास-वाणी ।।*
नरदेहाचें उचित ।
कांहीं करावें आत्महित ।
यथानुशक्त्या चित्तवित्त ।
सर्वोत्तमी लावावें ।।
हें कांहीच न धरी जो मनीं ।
तो मृत्यप्राय वर्तें जनीं ।
जन्मा येऊन तेणें जननी ।
वायांच कष्टविली ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०२/०४/१३-१४
मनुष्य जन्माला आल्याचे सार्थक कशात आहे ?
तर आत्मज्ञान प्राप्त करणे हेच आत्महित होय. यासाठी एकाग्र साधनेसाठी आपले चित्त सतत परमेश्वराच्या ठायीच हवे . याशिवाय परमेश्वराच्या सेवेसाठी यथानुशक्त्या जास्तीत जास्त धनसंपत्तीही खर्ची पडली पाहिजे. यामुळे प्रापंचिक आसक्ती नष्ट होऊन विरक्ती वाढेल, आणि परमार्थ सुलभ होईल.
ह्यातील एकही गोष्ट भगवंतासाठी करण्याचा विचार जो मनातसुद्धा आणत नाही त्याचे आयुष्य फुकट गेले समजावे. इतकेच नव्हे तर त्याचा जन्म सुद्धा वायफट असतो. जन्माला येऊन अशा भक्तीहीन करंटयाने त्याच्या आईला फुकटच कष्ट दिले म्हणायचे.
*भक्तिनिरूपण समास.*
*संकलक : सुधीर देशपांडे (आबा)*
🙏 💐💐💐💐 💐 🙏
0 टिप्पण्या