Ticker

6/recent/ticker-posts

रेतीचा काळाबाजार जोमात सुरू दिव्यांगांना घरकुल बांधण्यासाठी आजवर रेती मिळाली नाही,,

विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज,,

नांदेड-नांदेड तालुक्यामधे रेती माफिया चा धंदा जोरात सुरू आहे, आणि पोलीस प्रशासन व तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी, उघड्या डोळ्यांनी पाहून आंधळे पणाचा आव आणत आहेत, बिनधास्त रेतीचे टिप्पर,हायवा गाड्या रस्त्यावर धावताना दिसत आहेत, दिवसा ढवळ्या रेतीची तस्करी सुरू असताना पोलीस, प्रशासन तहशीलदार तलाठी मंडळ अधिकारी उघड्या डोळ्यांनी पाहून कारवाई का करत नाहीत, जनतेला हे कळायला लागलं की हे लोक आपली पोळी भाजून घेत आहेत, त्यांना कोणी विचारणार नाही, काळे धंदे बंद करण्यासाठी वरून पोजिशन टाईट असून ह्या लोकांना फरक काहीच पडतं नाही रेती माफिया चारपट भाव घेऊन रेती विकत आहेत गरिबांना घरकुल मंजूर होऊन बांधायला अवघड झाले आहे वाळू डेपो मधून दिव्यांगाना घरकुल बांधण्यासाठी पाच ब्रास वाळू मिळते हे फक्त सांगण्यापूरत ऊरल आहे ऐक हि दिव्यांगाला घरकुल साठी वाळू भेटलेली नाही, आॅनलाईन करून तहसील कार्यालयात रोज दिव्यांग चकरा मारत आहेत कोणीही विचारायला तयार नाही,एक तर सरकार ग्रामीण भागात घरकुल साठी सव्वा लाख देतय ते तर खालच बेसमेट करण्यात च निघून जातात बाकी वरच बांधकाम कुठून करणार सरकारला थोडी तरी काही वाटली पाहिजे शहरात अडीच लाख,, ग्रामीण भागात सव्वा लाख,,आर्ध्यला अर्धा फरक,आणी त्या मध्ये वाळू ऊपलब्ध करून द्यायची त्याचा पण काळाबाजार करुन आपल ऊखळ पांढर करून घेत आहेत,या वाळू माफिया वर कडक कारवाई केव्हा होणार त्यांनी वाळू साठवून ठेवली आहे,त्यावर धाड मारण्याचं धाडस कोण करणार, तहसीलदार, महसूल विभाग व पोलीस प्रशासन,आपले खिसे गरम करण्यातच मग्न आहे त,लोक प्रतिनिधी, कलेक्टर साहेब, यांनी या बाबी कडे लक्ष घालून योग्य ती कडक कारवाई करावी, गरीब दिव्यांगाना पाच ब्रास रेती चा पूरवठा करून द्यावा असी मागणी नागरिकांनी केली आहे, सामाजिक कार्यकर्ता, विजय चौडेकर, नांदेड,,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या