Ticker

6/recent/ticker-posts

काँग्रेसचे माजी मंत्री अनिस अहमद यांचा 'वंचित' मध्ये प्रवेश !

नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार

चित्रा न्युज ब्युरो
मुंबई :  राजगृह, मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार अनिस अहमद यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. अहमद हे नागपूर मध्य विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

लोकसभा निवडणुकीत आणि विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने मुस्लीम समुदायातील नेत्यांना डावलल्याने अनेक मुस्लीम नेते नाराज होते. वंचित बहुजन आघाडीने अनेक ठिकाणी वंचित जातींसोबतच मुस्लिमांनाही उमेदवारी दिली होती. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीमध्ये सर्वसमावेशकता असल्याचे सांगत राज्यातील मोठ्या मुस्लीम नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. 

विधानसभा निवडणुकीत सुद्धा वंचित बहुजन आघाडीने वंचित, शोषित, पीडित, तृतीयपंथी आणि महिला अशा सर्वच समाज घटकांना उमेदवारी देत घराणेशाही आणि कुटुंबशाही जोपासणाऱ्या राजकीय पक्षांना वंचितने सणसणीत चपराक लगावली आहे. आरक्षण हा विषय राज्याच्या राजकारणात सध्या केंद्रबिंदू मानला जात आहे. अशा वेळी या संदर्भातील स्पष्ट भूमिका घेणारा वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी इतर राजकीय पक्षांना मोठे आव्हान उभे करणार असल्याचे बोलले जात आहे.
---

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या