Ticker

6/recent/ticker-posts

मायेचा पदर अंजलीताई आंबेडकर..!


चित्रा न्युज ब्युरो
जालना :-प्रबुद्ध भारत वाचक मेळाव्याच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा.अंजलीताई आंबेडकर जालना जिल्ह्यात आल्या होत्या. या कार्यक्रमानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे तालुका कमिटी सदस्य अनिल हिवाळे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. अनिल हिवाळे यांचे नुकतेच अपघाती निधन झाले आहे. त्यामुळे त्यांच्या घरी भेट देऊन प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. 

अनिल हिवाळे यांना दोन मुली आहेत. त्या मुलींच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी वंचित बहुजन आघाडीने स्वीकारली.अंजलीताईनी मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारताच हिवाळे यांच्या कुटुंबियांचे डोळे भरून आले. आंबेडकर घराणे नेहमीच वंचित, शोषित, पीडित कुटुंबांना धीर आणि आधार देत आलेले आहे. अंजलीताई या हिवाळे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी झाल्या आणि मायेच्या पदराने त्यांचे अश्रू पुसले. हा प्रसंग पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले होते.
---


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या