मुंबईतील उमेदवारांच्या प्रचारार्थ ॲड.प्रकाश आंबेडकरांची जाहीर सभा
मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई येथील सर्व मतदार संघातील उमेदवारांच्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांची जोशाबा महासंकल्प सभा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नेहरू नगर, कुर्ला मुंबई(पू) येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर काही दिवसांपूर्वी अँजीओप्लास्टी झाली होती. त्यांनतर अवघ्या चार पाच दिवसांत ते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
संपूर्ण राज्यात त्यांचा दौरा सुरू आहे. ठिकठिकाणी मोठं मोठ्या सभा त्यांच्या होताना दिसत आहेत. जोशाबा महासंकल्प सभा म्हणजे फुले - शाहू - आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित सभा असा त्याचा अर्थ आहे. आता उद्या(दि.14) होणाऱ्या सभेत ॲड. आंबेडकर काय बोलणार, याकडे संपूर्ण मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या