ॲड. प्रकाश आंबेडकर : स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी आरक्षण राहणार नाही.
चित्रा न्युज ब्युरो
नागपूर : भाजपची आघाडी आणि काँग्रेसची आघाडी या दोन्ही आघाड्यांनी आरक्षण वर्गीकरण आणि क्रिमीलेयर यांच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय लागू करण्याची भूमिका घेतली असल्याने हे दोन्ही पक्ष आरक्षणविरोधी असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, निवडणूक लागण्याच्या पंधरा दिवस आधी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला. ज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला परवानगी दिली आहे. पण त्यामध्ये ओबीसींचा इम्पेरीकल डेटा नसल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण राहणार नाही. विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि नागपूर या भागात मराठा कुणबी आहे. त्यामुळे या चार जिल्ह्यात ओबीसी - मराठा आरक्षण असा संघर्ष दिसत नाही. पण उरलेल्या जिल्ह्यांत ओबीसी विरुद्ध मराठा असं भांडण लागलेलं दिसत आहे. दोन्ही आघाड्यांच्या यादीत ओबीसींना फार स्थान दिले आहे असं दिसतं नाही.
वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे की, जो म्हणत आहे एससी, एसटी आरक्षण वर्गीकरण हे चुकीचं आहे. हा पॉलिसी मॅटर आहे आणि पॉलिसी मॅटर सुप्रीम कोर्ट ठरवू शकते का ? असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला.
ज्यांना आरक्षणाचा फायदा झाला आहे, त्यांना क्रिमीलेयरमुळे आरक्षण मिळणार नाही असे जजमेंटमध्ये म्हटले आहे. त्यांना खरचं सवर्ण समाज हा स्वीकारणार आहे का ? असा सवालही आंबेडकर यांनी उपस्थित केला.
----
0 टिप्पण्या