Ticker

6/recent/ticker-posts

आ.प्रा.राम शिंदे यांचा निसटता पराभव मान्य;परंतु आ.शिंदेना विजयाच्या जवळ पोहचविण्यास दलित समाजाचा सिंहाचा वाटा..दलित एल्गार मेळावा सार्थक:- सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले...

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/ 9615179615

जामखेड:- कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुक अत्यंत चुरशीची होत ह्यात विद्यमान आमदार मा.रोहीत पवारांनी दुसर्‍यांदा बाजी मारत आपला गड राखला. परंतु लाखाचे मताधिक्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना फक्त 1243 वर समाधान मानावे लागले.
     कर्जत-जामखेड मतदारसंघात दलित समाजाचे 48 हजार निणार्यक मतदार आहेत सन 2019 ला आम्ही निर्धार मेळावा घेत सर्व दलित समाज विद्यमान आमदार मा.रोहीत पवार यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहत पवारंना घवघवीत यश संपादन करून देण्यात आम्ही यशस्वी झालो होतो परंतु 5 वर्षात दलित समाजाला गृहीत धरुन विकासात्मक दृष्टीने पुर्णपणे वंचित ठेवले.
        आ.प्रा.राम शिंदे विधानपरिषदेत आमदार झाल्यापासून फक्त 2 वर्षात मतदारसंघातील बहुतांश गावातील दलित वस्त्यांमध्ये बुध्दविहार,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर भवन,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे भवन,संविधान भवन यासाठी मोठ्या स्वरुपात निधी उपलब्ध करून दिला. आणि विशेषतः जामखेड शहरात सुमारे 1 कोटी 65 लाख रुपयाचे भव्यदिव्य बुध्दविहार उभा केले. त्यामुळे आ.प्रा.राम शिंदेच दलित समाजाचे हित जोपसतात असा सुर यावेळी समाजातून निघाला.समाजाच्या प्रवाहाबरोबर आम्ही राहण पसंद करत हजारोंच्या संख्येत दलित एल्गार मेळावा घेत आ.प्रा.राम शिंदेना जाहीर पाठिंबा दिला. 
        गावोगावी दलित वस्त्यांमध्ये जाऊन काॅर्नर बैठका घेऊन भारतीय जनता पार्टीचे व दलित समाजांच्या विचारांमध्ये भिन्नता जरी असली तरी आ.राम शिंदे यांचे व्यक्ती म्हणून महत्व पटवून देण्यात आम्हाला घवघवीत यश आले व 80% दलित समाजाने कमळ चिन्हासमोर बटण दाबुण आ.प्रा.राम शिंदे साहेबांना विजयाजवळ पोहचून कडवी झुंज दिली. मतदारांपर्यंत धनलक्ष्मीचा सर्रासपणे वापर करून विद्यमान आमदार मा.रोहीत पवारांनी यश मिळवले.     
       अशी माहीती सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले यांनी दिली.
    मतमोजणीत शेवटच्या क्षणी निसटता पराभव झाला. विद्यमान आमदार मा.रोहीत पवार यांचे निणार्यक असलेल्या दलित समाजामुळे 2019 च्या तुलनेत मतदान ही घटले व मताधिक्य ही घटले ही वस्तुस्थिती नाकारत येत नाही...
आ.प्रा.राम शिंदे अजून 4 वर्ष आमदार आहेत राज्यात महायुतीची सत्ता असल्याने मतदारसंघात आणखीन विविध विकासकामे होणार आहेत. जामखेड शहरात महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे भव्यदिव्य स्मारक उभारण्याची संकल्पना देखील आ.प्रा.राम शिंदे यांची आहे.
        आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या आव्हानाला प्रतिसाद देत मतदारसंघातील दलित समाजाने आ.प्रा.राम शिंदे यांच्या पारड्यात आपले अनमोल मत दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानत आ.प्रा.राम शिंदे यांच्यावर पुढील काळात विकासात्मक दृष्टिकोनातून विश्वास ठेवून बरोबर राहण्याचा निर्णय सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले यांनी घेतला आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या