Ticker

6/recent/ticker-posts

तुळजापूरच्या उमेदवार डॉ. स्नेहा सोनकाटे यांच्या प्रचारार्थ सुजात आंबेडकर यांची जाहीर सभा


चित्रा न्युज ब्युरो
तुळजापूर : तुळजापूर विधानसभा मतदार संघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉ. स्नेहा सोनकाटे यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची प्रचार सभा पार पडली. या सभेला विधानसभेतील मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. 

यावेळी प्रस्थापित आमदार आणि राजकीय नेत्यांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या प्रशासनाला सुजात आंबेडकर यांनी सज्जड दम दिला. आंबेडकर म्हणाले की, नाना पाटील आता आमदार राहणार नाहीत. कोकाटे ताई आमदार होणार आहेत. इथल्या पोलिस प्रशासनाला, निवडणूक अधिकाऱ्यांना, प्रशासनाला सांगतो की या नेत्यांचं हात तुमच्या डोक्यावरून निघाला, तर तुमची गाठ माझ्याशी आहे.

तसेच ओबीसी आरक्षण, वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा त्यातील वंचितांच्यासाठी आखण्यात आलेल्या योजना यावर देखील सुजात आंबेडकर यांनी भाष्य केले. राज्यातील अनेक महत्वाच्या प्रश्नांवर त्यांनी बोलताना लक्ष वेधले. यावेळी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे हे सुद्धा उपस्थित होते.
----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या