•लाखनी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:- लाखणी तालुक्यातील मोरगाव येथे सायंकाळी तलावावर गेलेल्या इसमाचा जाळीला लटकून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.02 नोव्हेंबर) सायंकाळी 5.15 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृतकाचे नाव रामू चमरू खेडकर अंदाजित वय (55) वर्ष रा. मोरगाव, ता. लाखनी असे आहे.सदर घटनेची माहिती लाखनी पोलिसांना दिली आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले होते.
मृतक रामू खेडकर हे अल्पभूधारक शेतकरी असून ढिवर समाजातील असल्याने मोल-मजुरी बरोबर मासे विक्री करत असत त्यातूनच आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत असत. शनिवारी सायंकाळच्या सुमारास गावातील मामा तलाव (गट क्रं.700) वर गेले होते. तलावातील नायलन जाळीला अडकल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला तलावाकडून आला नाही म्हणून भाऊ गेला असता त्याला जाळीत अडकलेला दिसल्याने बुडालेल्या भाऊ रामू खेडकर याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु तो पर्यत तलावातील पाण्यात बुडून मरण पावल्याचे दिसून आले. मृतक रामू खेडकर यास पत्नी व 1 मुलगा, 2 मुली असे तीन अपत्य आहेत. मन मिळाऊ रामूच्या अकाली निधनामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
0 टिप्पण्या