Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. बाबा आंबेडकर पुतळा परिसरात दगदफेक मुळे अचलपूरत तणाव


चित्रा न्युज ब्युरो
अमरावती :-जिल्ह्यातील ऐतिहासिक अचलपूर येथील बुंदेलपुरा भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात शुक्रवारी (20दिसें )ला सकाळी अद्यात माथेफिरू ने दगदफेक केल्याचे घटनेवरून परिसरात जनतेची एकच गर्दी होऊन तनावाची स्थिती निर्माण झाली हे पाहताअचलपूर पोलीस अतिरिक्त पोलीस दलासह घटनास्थळी दाखल झाली व तनावाची स्थिती नियंत्रणात आणून जनतेला समजावीण्याचे प्रयत्नात आहेत.
 नुकतेच दोन दिवसापूर्वी केंद्रीय गृहमंत्री शाह याचे वक्तव्यावरून संबंधित नागरिकांमध्ये नाराजी धुसमस्ट असतानाच शुक्रवारी अचानक डॉ. बाबा आंबेडकर पुतळा परिसरात दगदफेकीच्या व तेथेअनधिकृतपणे त्रिशूल उभारल्याचे घटनेने शहरात तनावाचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच अचलपूर पोलीस अतिरिक्त पोलीस कुमुकासह घटना स्थळी दाखल झाले व सम्पूर्ण बुंदेलपुरा क्षेत्रात पॉलिसीबल तैनात केले एवढेच नव्हेतर शासकीय दपतरत अतिसंवेदनशील शहर म्हणून अचलपूराची नोंद असल्याने सम्पूर्ण अचलपूर शहरात ठिकठिकाणी पोलीस तैनाती करण्यात आली आहे, तर दुसरीकडे पोलिसाचे एक पथक दगदफेक करणाऱ्या आरोपीचा शोधात गुंतले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या