केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार
चित्रा न्युज ब्युरो
मुंबई -रिपब्लिकन पक्षाने राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उत्तर महाराष्ट्र प्रदेश मधील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा स्नेह संवाद सोहळा उद्या रविवारी दि.8 डिसेंबर रोजी सकाळी 12.30 वाजता नाशिकमधील सातपुर येथील,लोंढे मार्ग प्रवेशद्वारा जवळ, बी एल व्ही डी रिर्सोट हॉटेल बँकव्हेट हॉल,त्र्यंबक रोड येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी दिली आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वात येत्या 2 मार्च रोजी नाशिक मध्ये भव्य बौध्दधम्म परिषद आयोजित करण्यात येणार आहे.त्याचे नियोजन करण्यासाठी या स्नेह संवाद सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी दिली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक,अहिल्यानगर,धुळे, नंदुरबार,जळगाव या जिल्हातील रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख पदाधिकऱ्यांनी या स्नेहसंवाद मेळाव्यात उपस्थित राहण्याचे आवाहन उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी केले आहे.


0 टिप्पण्या