Ticker

6/recent/ticker-posts

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले दुबई दौऱ्यावर

दुबईतील ग्लोबल व्हिलेजच्या  इंडियन पॅव्हेलियन ला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली सहकुंटुब भेट 

चित्रा न्युज ब्युरो
मुंबई : -रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे आठवडा भरासाठी दुबई दौऱ्यावर आहेत.दुबई दौऱ्यावर असताना ना.रामदास आठवले यांनी दुबई मधील ग्लोबल व्हिलेजच्या इंडियन पॅव्हेलियनला सहकुंटुंब भेट दिली.
ग्लोबल व्हिलेज हे दुबईतील सुप्रसिध्द स्थळ असुन येथे जगातील सर्व देशांचे पॅव्हेलियन आहेत.दुबई ग्लोबल व्हिलेज मधील इंडियन पॅव्हेलियनला ना.रामदास आठवले यांनी आज भेट दिली.यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी सौ.सिमाताई आठवले उपस्थित होत्या.
ना.रामदास आठवले दुबई दौऱ्यादरम्यान संयुक्त अरब अमीरातीमध्ये स्थायीक झालेल्या भारतीय उद्योजकांशी तसेच तिथे नोकरी करणाऱ्या इंटलेक्चुअल वर्गाशी आणि बौद्ध आंबेडकरी तत्वज्ञाचे काम करणाऱ्या दुबईतील काही कार्यकर्त्यांशी  चर्चा करणार आहेत.दुबईमधील विविध कार्यक्रमांना आणि पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणुन ना.रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या