चित्रा न्युज ब्युरो
लातूर :-गेल्या कांही दिवसापासुन कधी थंड तर कधी गरम व कधी ढगाळ.असे हवामान बदलत असल्याचा फटाका लहान लेकरांसह जेष्ठांना बसत आहे. परिणामी सर्दी,ताप,खोकला याचे रुग्ण वाढले असलेतरीही जनतेनी घाबरुन जाऊ नये.हंडरगुळी येथील सरकारी दवाखाण्यातील यंञणा ही 24x7 सज्ज आहे.तसेच रुग्णांनी डाॅक्टरांच्या सल्ल्यानेच दवा-पाणी घ्यावे,अशी माहिती हंडरगुळी {ता.उदगीर} येथील वैद्यकिय अधिकारी स्वप्णील संजय काळवणे यांनी आमच्या प्रतिनीधी जवळ बोलताना दिली आहे.
गत कांही दिवसापासुन वातावरणीय बदल वेगवेगळ्या प्रकारचा होताना अनुभवायला येत आहे.यामध्ये कधी थंड,कधी गरम तर कधीढगाळ असा हवामान बदल होत असल्याने सर्दी, ताप,खोकला याने अनेकांना बेजार करुन सोडले आहे.या रुग्णां मध्ये वयस्कर व बच्चेकंपनी हैरान झाले असलेतरीही हंडरगुळी येथील आरोग्य यंञणा रुग्णांच्या सेवेसाठी २४x७ सदैव तत्पर असल्याचे आणी परिसरातील 30 एक गावातील रोज शेकडो रुग्ण याचा लाभ घेतानाचे चिञ सरकारी व खाजगी दवाखान्या मध्ये दिसुन येत आहे.
वातावरणीय बदलामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो.सध्या ह्या भागात कधी ऊन्हाळा,कधी हिवाळा तर कधी पावसाळा यासारखे अजब, गजब हवामान निर्माण होत आहे.व असे हवामान बघून "आले निसर्गाचे मना,तेथे कुणाचे कांही चालेना" असे म्हटले जाते. ज्यांच्या अंगी रोगांचा प्रतिकार करण्याची क्षमता कमी असते.अशा रुग्णांना व्हायरल इन्फेक्शन लवकर "कॅच" करीत असते.आणि हंडरगुळीच्या प्रा.आ. केंद्रात रोज अंदाजे 125ते175रुग्ण उपचारासाठी येत असतात.तसेच बालक व जेष्ठ व्यक्तींनी घाबरुन न जाता.जवळच्या दवाखाण्याशी संपर्क करुन योग्यती तपासणी करुन डाॅक्टरांच्याच सल्ल्याने औषध,पाणी घ्यावे.असे डाॅ.एस.एस.काळवणे म्हणाले.
अत्यावश्यक त्या आरोग्य सुविधा व तुरंत प्रथमोपचार मिळत असल्याने हाळी,सुकणी,मोरतळवाडी,रुद्रवाडी चिमाचीवाडी,सुकणी (ता.उदगीर) बोरगाव,वडगाव,शेळगाव,डोंग्रज (ता.चाकुर) खरबवाडी,भाकरवाडी, वायगाव.बोडखा (ता.अहमदपुर) या व अन्य गावातील शेकडो बाह्यरुग्ण नियमीतपणे तपासणीसाठी आरोग्य केंद्र,हंडरगुळीत येताना दिरतात.
——————————————
हंडरगुळीच्या सरकारी दवाखान्यामध्ये 24x7 सेवा देण्यासाठी मी स्व:ता व कर्मचारी सज्ज आहोत. तसेच संसर्गजन्प आजारांपासुन स्व-रक्षण करण्यासाठी जनतेनी,रुग्णांनी पुरेसा सकस आहार घ्यावा.तसेच नियमीत योगा व तपासणी करावी व मास्क,हॅंन्डवाॅश याचा वापर करावा. अशी माहिती डाॅ. स्वप्नील संजय काळवणे वै.अ.प्रा. आरोग्य केंद्र.हंडरगुळी यांनी या प्रतिनिधीला दिली आहे.


0 टिप्पण्या