चित्रा न्युज ब्युरो
लातूर :-मागच्या कांही दिवसापासुन हाळी— हंडरगुळी {ता.उदगीर} परिसरामध्ये कधी थंड,कधी उष्ण व कधी ढगाळ अशा प्रकारचे वातावरणीय बदल होत असल्याने सर्दी,ताप,खोकला याप्रकारचे रुग्णवाढीवर या बदलाचा परिणाम झाला आहे.तसा परिणाम परिसरात मोहराने लगडलेल्या आंबा च्या झाडांवर ही होत असल्याचे समजते. कारण,बदललेल्या वातावरणामुळे आंब्याचा मोहर गळत असल्यामुळे याचे उत्पादन घटू शकते! परिणामी आंबा उत्पादक शेतकरीबांधवांचा पाय आर्थिक संकटाच्या खाईमध्ये अडकणार!अशी भीती व्यक्त केली जात आहे.
कधी ओला तर कधी सुका दुष्काळ हा शेतकरीबांधवांच्या पाचवीलाच पुजलेला आहे.यात भर म्हणुन की काय न मिळणारा विमा व अतिव्रष्टी चा दाम.! या सारख्या संकटाचा न डगमगता सामना करणा-या तसेच आंब्याची लागवड केलेल्या शेतकरी बांधवांच्यावर आतापासुनच आर्थीक संकट "दस्तक" देताना दिसत आहे. कारण,जराशी हटके शेती करावी, म्हणुन कांहींनी आंबा लागवड केली. व सध्या आंब्याचे झाड मोहोराने लगडल्याचे दिसत असल्याने यंदा उत्पादन बरे होईल.ही आशा वाटत असताना अचानक वातावणामध्ये थंड,गरम,ढगाळ असे अजब-गजब बदल होऊ लागल्याने मोहोर गळून पडत आहे.आणी याचा सर्वाधिक फटका फळ लागवडीवर होणार!ही भीती निर्माण झाली आहे.मोहोर गळू लागल्याने आंबा उत्पादन कमी अण् घाटा जास्त होणार.यामुळे संकट हे कांही बळीराजाची पाठ सोडत नाही.
*सध्याच्या हवामान बदलाचा फटका आंबा उत्पादकांना बसण्याची भीती आहे.कारण हवामान बदलामुळे झाडांना चांगला लागलेला मोहोर हा गळुन जात आहे.परिणामी आंब्याचे उत्पादन घटून शेतक-यांवर आर्थीक संक्रात येणार!अशी भीती शेतीनिष्ठ तज्ञ शेतकरी पंडीतराव दळवे-पाटील केकतसिंदगी यांनी वर्तवली आहे..*
0 टिप्पण्या