मायबाप सरकार, बहिणीला द्या, पण दिव्यांग, विधवा, म्हाताऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका !
चित्रा न्युज ब्युरो
भंडारा: सरकार द्वारे लाडक्या बहिनेचे अतोनात लाड सुरू असून, लाडक्या बहिण योजनेचे पैसे वरचेवर येत आहेत. पण पोटाची खडगी भरण्यासाठी श्रावणबाळ व निराधार योजनेच्या मानधनाची अत्यंत गरज असलेले लाभार्थी, मानधन मिळेल याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. आले का गा, महिने.... आले का गा महिने.... असे विचारता, विचारता.... ५ महिने लोटून गेले. पण महिना काही येत नाही.
त्यावर अवलंबून असणाऱ्या म्हाताऱऱ्यांचा तर धीर सुटत चालला, काही म्हातारे तर गावात भिक मागून कसतरी दिवस ढकलत आहेत.पण मायबाप सरकारला जाग येत नाही. निराधार व विधवा महीलान समोर तर, उदर निर्वाहाचे खुप मोठे प्रश्न झाले. ज्यांचा उदरनिर्वाह यांच्यावरच अवलंबुन आहे.ते एक तर भिख मांगणार किंवा आत्महत्या करणार. सरकार कुठपर्यंत या माऊल्यांचा अंत पाहणार.


0 टिप्पण्या