चित्रा न्युज ब्युरो
हंडरगुळी :- हाळी येथील बसस्थानकातील मैदानातील सिमेंट काॅंक्रिटीकरण कामाचे माजी मंञी संजय बनसोडे यांच्या हस्ते विधानसभा निवडणुकी पुर्वी उद्घाटन झाले होते.ते काम दोन कोटींचे असल्याचे कळते.माञ.गत कांही दिवसापुर्वी समाप्त झालेले काम व त्याचा दर्जा पाहता 2 कोटी रुपयांचे हे काम कांही लाखातच गुंडाळल्याची चर्चा हाळी येथील जनतेत आहे.कारण बसस्थानकाच्या समोरील मैदानात काॅंक्रिटीकरण झाल्याचे दिसत असलेतरीही महिलां पुरुषांसाठी असलेल्या स्वच्छता रुम शेजारी व इतर ठिकाणी काॅंक्रिट सिमेंट रोड केले नसल्याचे दिसत आहे.यामुळे 2 कोटींचे काम कांही लाखांमध्ये रफ्फादफ्फा करुन याचा गुत्तेदार व संबंधित अधिकारी माला- माल झाले असल्याची कुजबूज या गावातील जनतेतुन ऐकू येत आहे.
जर हे काम अपुर्ण व हलक्या दर्जाचे झाले असेलतर याच्या ठेकेदारास बील पास केले किती व का?असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय..
सदरचे काम महामंडळांतर्गत नव्हे तर एमआयडीसी मार्फत टेंडर द्वारे झाले आहे.अशी माहिती अश्वजित जानराव डी.सी.लातुर यांनी दिली
तसेच सदरच्या कामाबद्दल विचारणा केली असता एम.आय.डी. सी.चा फंड, इंजिनियर यांचाच याचा व आमचा संबंध नाही.तरीही कांही फंड व काम शिल्लक आहे, का.याची माहिती संबंधिताकडून घेतो.अशी माहिती जगदीश कोकाटे डिव्हिजनल इंजिनियर महामंडळ लातुर यांनी फोनवरुन दिली आहे.
0 टिप्पण्या