चित्रा न्युज ब्युरो
नांदेड :-हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील असलेले देवानंद गुंडेकर यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील कार्याला पाहता त्यांची राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी तसेच दैनिक अर्थ या दैनिकाच्या उपसंपादक पदी निवड करण्यात आली आहे.
आजच्या पत्रकारीता क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात डिजिटल मीडिया तसेच दैनिक वर्तमानपत्राद्वारे अनेक पत्रकार कार्य करत आहेत. पत्रकार क्षेत्रातील नव्याने नावलौकिक मिळवलेले हिमायतनगर तालुक्यातील पत्रकार देवानंद गुंडेकर यांनी आपल्या् प्रखर निर्भीड, लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. तसेच अगदी सामाजिक शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटविला आहे. स्वतः एक शिक्षक असताना विद्यार्थ्यांना भविष्याचे धडे देत देत पत्रकारितेच्या माध्यमातून समाजकार्य करत आहेत.
त्यामुळे अल्पवधीतच देवानंद गुंडेकर यांनी नावलौकिक मिळवल्याने. त्यांच्या या कार्याला पाहता राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी तसेच दैनिक अर्थ या दैनिकाच्या उपसंपादक पदी निवड करण्यात आली आहे.
यावेळी राज्य पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मधुसूदन कुलथे, प्रमोद जैन, राजकुमार बिर्ला, संदीप महाजन, बालाजी पेनुरकर, अनिल शिरसाट, ऍड.अनुप आगाशे, सिद्धोधन हनवते, प्रशांत राहुलवाड,विजय भालेराव, मनोज तपासकर, गणेश खडसे, अनिल नाईक, यावेळी उपस्थित होते.त्यांच्या या निवडीमुळे हिमायतनगर तालुक्यातील सर्व पत्रकार संघटनेद्वारे तसेच सर्व स्तरावरून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.
0 टिप्पण्या