Ticker

6/recent/ticker-posts

महाराजस्व अभियानामुळे वाडीवस्तीवर शेतरस्ते होतील हेच चळवळीचे सर्वांत मोठे यश- शरद पवळे/ दादासाहेब जंगले पाटील( महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळ)


कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचा ऐतिहासिक निर्णय

चित्रा न्युज ब्युरो
अहिल्यानगर : चे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ  यांनी जिल्ह्यातील तालुका प्रशासनास विशेष सूचना देत शिव पानंद शेतरस्त्यांसाठी दि.१३/०१/२०२५ ते २८/०२/२०२५ या कालावधीमध्ये जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने १७ फेबुवारी महामोर्चाचे निवेदन देवून महाराजस्व अभियानासह विधिध मागण्या जिल्हाधिकार्यालयाकडे करण्यात आल्या होत्या,
         जिल्हाधिकारी यांनी मागणीची दखल घेत पुन्हा नव्याने कालबद्ध  महाराजस्व अभियान राबविण्यासाठी जिल्ह्यासाठी विशेष परिपत्रक काढत तहसिल कार्यालयांना तातडीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तुकडेवारी सोबत कुटुंबाचे विभाजन होत असल्याने शेतीचेही विभाजन होत आहे त्यामुळे क्षेत्र कमी कमी होत असुन त्यामुळे दिवसेदिवस शेतरस्त्यांचे प्रश्न वाढत चालले असुन वहिवाटीचे शेतरस्ते बंद होताना दिसत आहेत, शेतीसाठी शेतीपुरक व्यवसायांसाठी, दळणवळणाठी शिव पानंद शेतरस्ते होणे गरजेचे असल्याने शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने सातत्यपूर्ण पाठपुरावा करत शेतरस्त्यांच्या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधले असता जिल्हा प्रशासनाने मागण्यांची दखल घेतली तमाम अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या तालुक्यात पारदर्शक अभियान पार पाडण्यासाठी पाठपुरावा करावा, तरी पुन्हा तहसिल कार्यालयांनी पारदर्श अभियान पार न पाडल्यास १७ फेब्रुवारीला अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर नियोजित महामोर्चा काढण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी बोलताना प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

*शेवटच्या शेतकऱ्याला दर्जेदार शेतरस्ता मिळेपर्यंत समधान नाही- पवळे*
चौकट ओळ - शिव पानंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने राज्यभर सुरू केलेल्या आंदोलनाला मोठे यश येत असुन अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवपानंद शेतरस्त्यांच्या प्रश्नावर पेरू वाटप आंदोलन केले असता आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात महाराजस्व अभिमान राबविले परंतु तालुका प्रशासनाकडून शेतकऱ्यांसमवेत जिल्हाधिकाऱ्यांची फसवणूक केली यामुळे पुन्हा चळवळीच्या वतीने या प्रश्नावर पाठपुरावा केला असता  अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी पुन्हा महाराजस्व अभियानाच्या सुचना तालुका प्रशासनास  दिल्या आहेत तरी शेतकऱ्यांनी जागरुकतेने महाराजस्व अभियान पार पाडून घ्यावे- शरद पवळे / दादासाहेब जंगले पाटील( महराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळ).

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या