चित्रा न्युज ब्युरो
पुणे : राज्यात महिलांवरील अत्याचारांची संख्या अत्यंत वेगाने वाढत आहे तसेच पुणे शहरांमध्ये अनेक ठिकाणी विविध प्रकारचे अत्याचार राजरोसपणे घडताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहराच्या वतीने स्त्रीशक्ती हेल्पलाइनचे 7058 719 719 उद्घाटन करण्यात आले. यावेळी लाल महाल येथील राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष सागर नामदेव आल्हाट यांनी केले, तर हेल्पलाईनचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव ॲड. प्रियदर्शी तेलंग, साई फिटनेसचे संस्थापक/ चेअरमन हिरामण धनकवडे, सामाजिक कार्यकर्त्या साईलीताई नांगरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी भारिप बहुजन महासंघाचे माजी अध्यक्ष ॲड. किरण कदम, वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य पुणे जिल्हा निरीक्षक ऋषिकेश नांगरे पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य विशाल गवळी, अध्यक्ष सोमनाथ पानगावे, मुकेश यादव अध्यक्ष राजमाता जिजाऊ जयंती उत्सव समिती व शिवजयंती उत्सव, शहराध्यक्ष ॲड.अरविंद तायडे, महिला अध्यक्ष अनिताताई चव्हाण, सम्यक विद्यार्थी आंदोलन शहराध्यक्ष चैतन्य इंगळे, सोलापूर महानगरपालिका निरीक्षक उत्तम वनशिव हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे निमंत्रक युवा उपाध्यक्ष पौर्णिमा ओव्हाळ, युवा सचिव सिमरन शेलार, युवा उपाध्यक्ष रक्षणी शेंडकर, युवा सचिव सुहास महाडिक हे होते.
शहर संघटक नागेश भोसले, युवा उपाध्यक्ष अविनाश चौधरी, युवा सचिव नितीन कांबळे, पर्वती विधानसभा अध्यक्ष रवींद्र गायकवाड, उपाध्यक्ष विकास भेगडे पाटील, सचिव पितांबर धिवार, सिद्धार्थ उगळे, युवा संघटक धम्मपाल बनसोडे, युवा सचिव श्रीकांत जगताप, युवा सचिव किरण सैंदाणे, युवा संघटक योगेश सुरवसे, सचिन शिंदे, महिला आघाडी महासचिव ॲड. रेखा चौरे, महासचिव सारिका फडतरे, सचिव सविताताई चाबुकस्वार, उपाध्यक्ष प्रतिमा कांबळे, संघटक निरंजना सोनवणे, प्रसिद्धी प्रमुख लीनाताई वानखेडे, सम्यक विद्यार्थी आंदोलन महासचिव जान्हवी शेलार, उपाध्यक्ष प्रज्योत गायकवाड, उपाध्यक्ष जीवन रोकडे, उपाध्यक्ष दीपक कदम, उपाध्यक्ष बाळासाहेब बनसोडे, खडकवासला विधानसभा अध्यक्ष मधुकर दुपारगुडे, हडपसर विधानसभा युवा अध्यक्ष लखन कांबळे, युवा उपाध्यक्ष शुभम आल्हाट, युवा उपाध्यक्ष मिलिंद गायकवाड, युवा सचिव अभिमन्यू सूर्यवंशी, पुणे कँटोन्मेंट विधानसभा युवा अध्यक्ष किशोर रीकिबे, युवा संघटक अमर सावंत, युवा संघटक पुणे कँटोन्मेंट प्रवीण बागुल, खडकवासला विधानसभा युवा अध्यक्ष राजेंद्र कांबळे, युवा महासचिव गौतम तायडे, युवा उपाध्यक्ष राहुल रिकिबे, सचिव गोपाळ वाघमारे, सुनील धेंडे, प्रभाग ३७ अध्यक्ष विजय साळवे, सदस्य पांडुरंग वनशिव, राजु वनशिव, अरविंद कांबळे, मनसा प्रसाद, तानाजी भोसले, सचिन गाडे, राजु जावळे, शिवाजी गायकवाड, अजय भालेराव, विजय वनशिव, अमित यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन संदीप चौधरी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन युवा शहर महासचिव शुभम ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले.


0 टिप्पण्या