किनगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे ना.रामदास आठवले यांच्या हस्ते अनावरण
चित्रा न्युज ब्युरो
मुंबई : - काँग्रेसने काश्मिरमध्ये संविधान लागु केले असते तर काश्मिरचा प्रश्न चिघळला नसता.कलम 370 हटवीले यामुळे काश्मिरचा विकास झपाट्याने होत अहे, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
फुलंब्री तालुक्यातील आदर्शगाव किनगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ना.रामदास आठवले यांच्या हस्ते झाले,त्यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी आमदार अनुराधा अतुल चव्हाण ह्या होत्या.किनगाव चे सुपुत्र अतुल चव्हाण; रिपब्लिकन पक्षाचे राज्य कार्याध्यक्ष बाबूराव कदम ; मराठवाडा अध्यक्ष मिलिंद शेळके ; विजय मगरे; राजू प्रधान भाजप जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ सरपंच मनीष चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.सुत्रसंचालन कल्याण चव्हाण यांनी केले
. डॉ.बाबासाहेब अंबेडकर यांच्या संविधानामुळे मी केंद्रात आहे.मोदी-शहा यांनी कलम 370 हटवून काश्मिर मधील आतंक संपवला.तेथे विकासचे पर्व सुरु झाले.370 कलम हटविल्यापासुन अडीच कोटी पर्यटकांनी पर्यटन केले.यामुळे रोजगार व व्यवसाय वाढला.कधी रस्ते माहित नव्हते रस्ते पुर्ण झाले.यामुळे काश्मिरी जनता खुश आहे.आमदार अनुराधा चव्हाण,बाबुराव कदम,सुहास शिरसाठ यांची भाषणे झाली.यावेळी पुर्णाकृती पुतळ्यासाठी जागा दान करणाऱ्या मंजाबाई साळवे यांच्या मुलाचा सत्कार आठवले यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी आर पी आय चे तालुका अध्यक्ष राजु प्रधान,मिलिंद शेळके,विजय मगरे,संजय ठोकळ,शिवाजीराव पाथीकर,जितेंद्र जैस्ववाल,सुचित बोरसे,भाजपा शहर अध्यक्ष योगेश मिसाळ,सरपंच मनिषा अनिल चव्हाण,उपसरपंच किशार चव्हाण,बाळासाहेब शिंदे यांची उपस्थीती होती.
0 टिप्पण्या