चित्रा न्युज ब्युरो
सोलापूर :-१९ डिसेंबर ते २२ डिसेंबर दरम्यान बिलासपूर (छत्तीसगढ) येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत १४ वर्षीय वयोगटात महाराष्ट्राचा संघ सहभागी झाला होता. या संघाचे नेतृत्व माढा तालुक्यातील पडसाळीच्या हर्षवर्धन महेश पाटील याने केले. या संघात १६ खेळाडुंची निवड ही राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेतून करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्यातुन महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व पडसाळी (ता. माढा) गावचे सुपुत्र चि. हर्षवर्धन महेश पाटील याने केले. अटीतटीच्या झालेल्या लढतीत महाराष्ट्राच्या संघाने तिसरा क्रमांक पटकावत ब्रॅान्झ पदक मिळवुन महाराष्ट्र राज्याची मान देशात उंचावण्याचे काम केले. त्याबद्दल विविध स्तरातुन खेळाडुंचे कौतुक करण्यात येत आहे. लहान वयात बिलासपूर(छत्तीसगड) येथे जाऊन पंजाब राज्याच्या अनुभवी संघावर मात करून विजय संपादन केला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक छत्तीसगड संघाचा आला, त्याचबरोबर द्वितीय क्रमांक दिल्ली संघाने मिळवला. कुर्डूवाडी येथील नुतन विद्यालयात सातवी इयत्तेत शिकणाऱ्या चि. हर्षवर्धन यांने जिद्द व चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्राच्या संघात आपले स्थान मिळवले. यावेळी बोलताना हर्षवर्धनने सांगितले की, भविष्यात बेसबॉल स्पर्धेत करिअर करण्यासाठी प्रशिक्षक यादव सर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणार आहे. ॲालंपिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मी आतापासूनच तयारी करणार असल्याचे सांगितले. ॲालंपिक स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणे हेच माझे स्वप्न आहे. मला या स्पर्धेत यश मिळविण्यासाठी माझे आईवडील व प्रशिक्षक यादव सर त्याचबरोबर नातेवाईक यांनी मोलाचे सहकार्य केले.
विजयी मिळाल्याबद्दल काल पडसाळी येथे राष्ट्रीय खेळाडू हर्षवर्धन याचा जिल्हा परिषद शाळा पडसाळी येथे पडसाळी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच दत्तानाना फरड यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य प्रताप पाटील उपस्थित होते. या सत्कार समारंभाचे आयोजन पडसाळी गावचे सरपंच योगेश पाटील यांनी केले.
यावेळी सरपंच योगेश पाटील यांनी भविष्यात पडसाळी गावातील विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळात देखील पुढे राहण्याची अपेक्षा व्यक्त केली. पडसाळी गावच नाव हर्षवर्धनने उज्वल केलं भविष्यात अनेक हर्षवर्धन पडसाळी गावातुन तयार होण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
तसेच डॉ. प्रवीण पाटील यांनी खेळाबद्दल सर्व माहिती मुलांना उलगडून सांगितली १३ व्या वर्षी देशाचं पदक मिळवायचं सोपं काम नाही असं सांगितलं व हर्षवर्धन ला पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा दिल्या.
यावेळी संत कुर्मदास डिस्टलरीचे संचालक सचिन पाटील, कुर्मदास पाटील, माजी उपसरपंच भारत देशमुख, ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब मुटकुळे, नामदेव मुटकुळे, मोडनिंब ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ माळी, महादेव देशमुख, सोसायटी माजी चेअरमन दादासाहेब देशमुख, सोसायटी सदस्य आण्णासाहेब मुटकुळे, सुरेश देशमुख, दत्तात्रय देशमुख, विष्णू देशमुख, नरसिंह सलगर, उमेश मुटकुळे, समाधान मुटकुळे, तानाजी देशमुख, दत्तात्रय पाटील, प्रवीण पाटील, किरण पाटील, बालाजी पाटील, धनंजय पाटील, मुख्याध्यापक ठाकरे सर, शेलार सर, टोगे सर बरबडे सर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
0 टिप्पण्या