चित्रा न्युज ब्युरो
नांदेड :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने दि.०३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजतास्त्री मुक्ती आंदोलनाच्या प्रणेत्या साविञीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्राजवळील (आयटीआय) येथील पुतळ्यास मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री गिरीश कदम, उपायुक्त सौ.सुप्रिया टवलारे, लेखाधिकारी श्री श्रीनिवास चन्नावार,सहाय्यक आयुक्त कु.मनिषा नरसाळे, क्षेत्रिय अधिकारी श्री गौतम कवडे, अग्निशमन अधिकारी श्री के.जी. दासरे, प्रकल्प व्यवस्थापक श्री अशोक सुर्यवंशी, वरिष्ठ लिपीक श्री साहेबराव ढगे, सौ.सुजाता वाडियार, श्री राजेश क-हाळे, श्री गजानन रासे, श्री साहेबराव जोंधळे, सौ शुभांगी चौधरी, श्री आनंदा खानसोळे यांच्यासह मनपाचे इतर कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या