Ticker

6/recent/ticker-posts

माणुसकीचा हात आणि सेवाभाव: नेते साहेबांची व्याहाड बुज येथील अपघातग्रस्त व्यक्तीला मोलाची साथ

चित्रा न्युज ब्युरो
गडचिरोली :-व्याहाड बुज येथील भूपेंद्र ऊर्फ दादू गोविंदा मांदाडे यांचा काही दिवसांपूर्वी मोटार सायकल ने  हरणघाट मार्गावर दुर्दैवी अपघात झाला होता. त्यांच्या प्रकृतीच्या गंभीरतेमुळे त्यांना तातडीने नागपूर येथील चिरायु हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळताच व्याहाड बुज ग्रामपंचायत सदस्य दिवाकर गेडाम यांनी माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांच्याशी संपर्क साधला.

नेते साहेबांनी तत्काळ परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चिरायु हॉस्पिटलला भेट दिली. त्यांनी भूपेंद्र यांच्या प्रकृतीची डॉक्टर शशांक वरखडे यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. तसेच डॉक्टरांना आवश्यक ती सर्व काळजी घेण्याच्या सूचना केल्या. त्यांनी डॉक्टरांना सांगितले की, “हा पेशंट माझ्या क्षेत्रातील असून, त्याच्या उपचारात कुठलीही कसूर होऊ देऊ नका.”

यानंतर मा.खा. नेते साहेबांनी भूपेंद्र यांच्या कुटुंबियांशी भेट घेतली. त्यांनी त्यांच्या आई व निशिगंधा मांदाडे यांना धीर देत सांगितले, “तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे.” त्यांच्या शब्दांनी कुटुंबीयांच्या मनाला मोठा आधार मिळाला. तसेच नेते साहेबांनी आपल्या माणुसकीच्या भावनेतून आर्थिक मदतही प्रदान केली.

व्याहाड बुज या गावावर नेते साहेबांचे विशेष प्रेम आहे. या प्रसंगी त्यांनी एक आदर्श नेता कसा असतो, याचा उत्कृष्ट नमुना सादर केला. माणुसकीचा हा हात आणि त्यांनी दाखवलेली तत्परता संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी ठरली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या