Ticker

6/recent/ticker-posts

आदर्श सार्वजनिक वाचनालय येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिवस उत्साहात साजरा •••••••••••••

चित्रा न्युज ब्युरो
गोरेगाव -   तालुक्यातील मोहाडी येतील अ दर्जा प्राप्त ग्रंथालय आदर्श सार्वजनिक वाचनालय येथे आज दिनांक ३ जानेवारी ला स्त्री शिक्षणाची जनक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती साजरी करण्यात आली 
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष जे जे पटले, मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे, तंन्टामुक्त गांव समिती चे अध्यक्ष लिखीराम बघेले, पोलिस पाटील राजेश येळे, संस्थेचे सदस्य हिरालाल महाजन,वाय एफ पटले सर,प्रमानंद तिरेले,चंन्द्रकुमार चौरागडे ,डि आर चौरागडे,शिवराम मोहनकार, ग्रांम पंचायत सदस्य भिवराज शेंन्डे, मुकेश येरखडे आदी मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पन करून अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांनी सांगितले की महिलांसाठी शिक्षणाचे द्वार खुले करणार्या आद्य शिक्षिका,सामाजसेविका आणि सत्यशोधक समाजाच्या एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या स्त्री शिक्षणाची जनक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या गुणगौरव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ३ जानेवारी हा १९५५ पासुन बालिका दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली आता स्त्रीया केवळ चुल आणि मुल इतक्याच चौकटीत अडवून न राहता बाहेर पडुन काम करू लागल्याने त्यांच्या जिद्दीला प्रोत्साहन देण्यासाठी बलिका दिनाचे विशेष महत्त्व आहे सावित्रीबाई फुले याचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी झाला सावित्रीबाई यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते सावित्रीबाई फुले याचा विवाह लहानपणी च म्हणजे वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सी झाला असे प्रतिपादन केले 
कार्यक्रमाचे संचालन व प्रस्थाविक संस्थेचे सचिव सुभाष चौरागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन आशा चेचाने यांनी केले यावेळी गावातील नागरिक महिला पुरूष व वाचक विध्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या