Ticker

6/recent/ticker-posts

इंडियन रेडक्रॉस सोसायटी भंडारा तर्फे आयोजित आसगाव पूरपीडित लाभार्थ्यांचे साहित्य वाटपाचा समारोप,,,


( सेक्रेटरी डॉक्टर नितीन तुरस्कर, आयरन लेडी श्रीमती मीरा भट यांच्या विशेष सत्कारासह उपस्थित आजीवन सदस्य महिला पुरुषांचा सत्कार, इंडियन रेडक्रॉस सोसायटी तर्फे सर्वांना ऑक्सी मीटर चे वाटप,,,)
      
चित्रा न्युज ब्युरो
 भंडारा :-आसगाव, तालुका पौणी,जिल्हा भंडारा येथील पूरग्रस्तांसाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटी तर्फे मदत साहित्य वाटपाचा समारोप  सिविल लाईन भंडारा येथे संपन्न झाले. समारोपाचे अध्यक्ष स्थानी उपाध्यक्ष डॉक्टर चंद्रमोहन गुप्ता, अतिथी सेक्रेटरी डॉक्टर नितीन तुरस्कार डॉक्टर, चेअरमन  अशोकराव ब्राह्मणकर हे होते. डॉक्टर गुप्ता, डॉक्टर ब्राह्मणकर यांनी भंडारा रेड क्रॉस सोसायटीच्या कार्यप्रणाली बाबत विचार व्यक्त केले तर आसगाव येथील पूरग्रस्तांच्या मदतीचा आढावा सेक्रेटरी डॉक्टर नितीन तुरस्कर यांनी सादर केला. यात सिक्रेटरी नितीन तुरस्कार यांचा सामूहिक सत्कार घेण्यात आला. आयरन लेडी श्रीमती मीरा भट्ट यांचे सह उपस्थित रेडक्रॉसचे आजीवन  सक्रिय सदस्य महिला  पुरुषांचाही सत्कार करण्यात आला. तसेच कुमारी प्राची केशव चटक भंडारा कर्णधार भारतीय आट्यापाट्या संघ यांनी स्वर्ण पदक मिळवून दिल्याबद्दल त्यांचाही  विशेष सत्कार करण्यात आला. 
व डॉक्टर अशोकराव ब्राह्मणकर यांच्या हस्ते सर्वांना पल्स ऑक्सिमीटरचे वाटप करण्यात आले.
      प्रास्ताविक,सूत्रसंचालन साहित्यिक राजूभाऊ खवसकर,आभार प्रदर्शन    रक्तदूत प्रीतम कुमार राजाभोज यांनी केले.
      याप्रसंगी इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे गणमान्य कोषाध्यक्ष हेमंत कुमार चंदवासकर, दीपक व्यवहारे, डॉक्टर जयंता गिरिपुंजे , सेवकराम शाहू, रविशंकर साकोरे, समीर नवाज, विलास केजरकर, वासुदेव निर्वाण, दिनेश भाई वसानी, पुरुषोत्तम गुल्हानी , सुरेश मोहबे, रवींद्र नागपुरे, डीएम अत्करी, सौ पद्मा खवसकर,संगीता डहाके, दिनेश पंचबुधे, डॉक्टर निधी डोये इत्यादी उपस्थित होते. सर्वश्री डॉक्टर आर.जी. व्यवहारे, डॉक्टर विजय ठक्कर सपत्नीक, डॉक्टर स्नेहा  तुरस्कर, डॉक्टर शुभम निखाडे, डॉक्टर विशाखा गुप्ते, डॉक्टर रश्मी गुप्ता, ज्योती मेश्राम, श्वेता शिंगाडे, कुमारी दर्शना डहाके, योगेश मुळे, माधव पाऊल झगडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
     राष्ट्रगीतांनी कार्यक्रमाची सांगता झाली व सुरुची भोज देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या