Ticker

6/recent/ticker-posts

मौजे मांडवे ग्रामपंचायत हद्दीमधील विकास कामाच्या गुणवत्तेमध्ये कोणतेही तडजोड खपवून घेणार नाही- सरपंच रितेश पालवे पाटील


बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा अन्यथा विभागीय आयुक्ताकडे तक्रार देऊन आंदोलन करणार- 

चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :  माळशिरस ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनेक विकास कामे चालू आहेत. व चालू होणार आहेत.त्या कामांमध्ये बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व कामे निविदे नुसार चांगल्या  प्रतीची तसेच संपूर्ण मटेरियल चांगल्या गुणवत्तेचे वापरून कामे करून घ्यावीत. पाठीमागील अनेक कामे अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्यामुळे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. त्यामुळे शासनाने दिलेला निधी अधिकारांच्या साथीने ठेकेदारांच्या घशात जात आहे. विकास कामे करत असताना ठेकेदारांच्या चिरीमिरी साठी संबंधित अधिकारी गावाला मिळालेल्या रस्त्याची वाट लावत आहेत .रस्ते एक दोन वर्षांमध्ये खराब होतात.या सर्व परिस्थितीला बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत. यापुढे ठेकेदारांना पोचणाऱ्या अधिकाऱ्यांची गये केली जाणार नसल्याचे यावेळी मांडवे ग्रामपंचायतचे धडाकेबाज सरपंच रितेश पालवे -पाटील यांनी सांगितले. सध्या मांडवे ग्रामपंचायत हद्दीमध्ये pwd ची मांडवे मेन पेठ,गिरवी मांडवे रोड, मांडवे, कन्हेर,मांडकी,जळभावी रोड, राष्ट्रीय महामार्ग ते टेळे वस्ती रस्ता. मांडवे जगताप वस्ती जुना भांबुर्डी रोड,50 फाटा मांडवे रोड मुख्यमंत्री सडक योजना रस्ता तसेच बाकी चालू असलेल्या कामांमध्ये गुणवत्तेबाबत कोणतेही हयगय खपवून घेणार नाही.अधिकारी जर चुकार पणा करत असतील तर अधिकाऱ्यांची विभागीय आयुक्त यांना तक्रार करणार व त्या चुकार अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये लोकशाही मार्गाने विभागीय आयुक्त पुणे या ठिकाणी वेळ पडली तर आंदोलन ही करणार असाही निर्वाणीचा इशारा सरपंच रितेश दादा पालवे पाटील यांनी यावेळी दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या